‘युनेस्को’ने गुजरातच्या पारंपारिक गरबा नृत्याचा अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीमध्ये समावेश करण्यास मान्यता दिली आहे. देशातील अनेक भागांमध्ये नवरात्रउत्सवादरम्यान सादर करण्यात येणाऱ्या गरबा या यादीत समाविष्ट करण्यासाठी भारताने नामांकित केले होते.
• सांस्कृतिक वारशाच्या सुरक्षेसाठी कासाने बोत्सवाना येथे 4 डिसेंबर पासून सुरू झालेल्या आंतर- सरकारी समितीची 18 व्या बैठकीत गरब्याचा यादीत समावेश करण्यात आला.
• या यादीत समावेश होणारा गरबा हा 15 वा सांस्कृतिक वारसा आहे.


