Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला चार पदके

  • आंतरराष्ट्रीय गणित आणि भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये पदकांची लयलूट केल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांच्या संघाने सौदी अरेबियातील रियाध शहरात रंगलेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले आहे.
  • 2024 च्या या स्पर्धेत 94 देशांतील (5 निरीक्षक देशांसह) 327विद्यार्थी सहभागी झाले होते.
  • देशनिहाय पदकतालिकेत या वर्षी भारत अकराव्या स्थानी आहे.
  • सौदी अरेबियातील रियाध शहरात 21 ते 30 जुलै या कालावधीत 56 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे 2024आयोजन करण्यात आले होते.
  • भारतीय विद्यार्थ्यांच्या संघातील महाराष्ट्रातील जळगावमधील देवेश पंकज भैया याने सुवर्ण पदक पटकावले.
  • मुंबईतील अवनीश बन्सल आणि तेलंगणामधील हैदराबाद येथील हर्षिन पोसीना यांनी रौप्य पदकांची कमाई केली.
  • तर मुंबईतील कश्यप खंडेलवाल याने कांस्य पदक जिंकले.
  • होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र हे, विविध ठिकाणी होणाऱ्या गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यार्थ्यांना निवडण्याचे तसेच प्रशिक्षणाचे नोडल केंद्र आहे.
  • होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राद्वारे घेतली जाणारी राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षा अंतिम संघ निवडीसाठीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखली जाते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *