राष्ट्रीय भू-अवकाशीय माहिती-आधारित भूमी सर्वेक्षण प्रकल्प
- केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते 18 फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशमध्ये रायसेन येथे शहरी भागातील वसाहतींचे राष्ट्रीय भू-अवकाशीय माहिती-आधारित भूमी सर्वेक्षण करण्यासंदर्भातील भारतातील 26 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशांमधील (UTs) 152 शहरी स्थानिक संस्थांमधील (ULBs) प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे.
- भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूसंसाधन विभागाने हा पथदर्शी कार्यक्रम सुरू केला आहे.
- जमिनीच्या स्वामित्वाविषये अचूक व विश्वासार्ह दस्तऐवज सुनिश्चित करण्यासाठी शहरी भागात जमिनीच्या नोंदी करणे तसेचअद्ययावत करणे, हे ‘नक्षा’ या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
- हा उपक्रम नागरिकांना सक्षम करेल, राहणीमानात सुधारणा करेल, शहरी भागासाठी अधिक नियोजन केले जाईल व जमिनीशी संबंधित वाद कमी करेल. मालमत्तेची नोंद झाल्याने माहिती तंत्रज्ञान-आधारित प्रणालीमुळे प्रशासनासाठीही पारदर्शकता, कार्यक्षमता व शाश्वत विकासाला समर्थन मिळेल.