- दक्षिण चीन समुद्र आणि उत्तर प्रशांत महासागरात तैनात भारतीय युद्ध नौका शिवालिक जगातील सर्वात मोठा नौदल सराव असलेल्या रिम ऑफ द पॅसिफिक (RIMPAC) मध्ये सहभागी होण्यासाठी हवाई येथील पर्ल हार्बरवर पोहोचले.
- भारत आणि जपान यांच्यातील जिमेक्स 24 हा द्विपक्षीय सराव पूर्ण झाल्यावर आयएनएस शिवालिक गुरुवारी पर्ल हार्बरसाठी रवाना झाले.
- 27 जून ते 7 जुलै 2024 दरम्यान होणाऱ्या सरावाच्या बंदर टप्प्यात विविध परिसंवाद, सराव, नियोजन संबंधी चर्चा, क्रीडा स्पर्धात सहभाग आणि परस्परांच्या जहाजांना भेटी यांचा समावेश असेल.
- रिमपॅक – 24 चा सागरी टप्पा, तीन उप-टप्प्यांमध्ये विभागलेला असून पहिल्या दोन उप-टप्प्यांमध्ये मूलभूत आणि प्रगत स्तरावरील एकीकरण सराव करणारी जहाजे पहायला मिळतील.
- कार्यक्रमाची सांगता थिएटर लेव्हल लार्ज फोर्स टॅक्टिकल सरावाने होईल.
- या सरावात एअरक्राफ्ट कॅरियर बॅटल ग्रुप, पाणबुड्या, सागरी पूर्व परीक्षण विमान, मानवरहित विमाने, रिमोटली पायलेटेड सर्फेस शिप्स आणि बहुराष्ट्रीय नौदलाच्या विशेष दलांच्या संयुक्त मोहिमांसह जमीन आणि पाण्यावरील फोर्स लँडिंग ऑपरेशन्सचा सहभाग असेल.
- सहा आठवड्यांहून अधिक कालावधीचा सराव आणि प्रशिक्षण असलेल्या रिमपॅक -24 चे उद्दिष्ट, आंतरपरिचालन क्षमता वाढवणे आणि मित्र देशांच्या नौदलांमध्ये विश्वास निर्माण करणे, हे आहे.
- अमेरिकी नौदलाच्या नेतृत्वाखाली, सुमारे 29 देश यंदाच्या बहुआयामी सरावात सहभागी होत आहेत.
- रिमपॅक-24 हा जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय सागरी सराव सहभागी देशांमधील सहकार्य संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी एक अनोखी प्रशिक्षण संधी प्रदान करतो, जे सागरी मार्गांची सुरक्षा आणि जगातील महासागरांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
- भारतीय किनारपट्टीपासून 9000 सागरी मैल दूर रिमपॅक-24 मधील आयएनएस शिवालिकचा सहभाग, हा जगाच्या कोणत्याही भागात मोहीम राबवण्याच्या भारतीय नौदलाच्या क्षमतेचा दाखला आहे.
- आयएनएस शिवालिक ही 6000 टन वजनाची, स्वदेशी बनावटीची मार्गदर्शित-क्षेपणास्त्र युद्धनौका आहे.



