- परदेशस्थ भारतीयांनी देशात आर्थिक वर्ष 2023 मध्ये 120 अब्ज डॉलरची रक्कम (रेमिटन्स) पाठवली असल्याचे जागतिक बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
- अमेरिकेत आलेल्या रेमिटन्सच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट असून, रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या देशांमध्ये भारत अव्वल स्थानावर आहे.
- या वर्षात भारताला मिळणाऱ्या रेमिटन्समध्ये 2022 च्या तुलनेत5 टक्के वाढ झाली आहे.
- भारताला सर्वाधिक रेमिटन्स अमेरिकेतून मिळाला असून, त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीचा क्रमांक लागतो.
- भारताला मिळणाऱ्या रेमिटन्समध्ये होणाऱ्या वाढीत अमेरिका आणि युरोपमधील कामगार बाजारपेठतील मागणीचा मोठे योगदान आहे.
- अमेरिकेनंतरचा दुसरा सर्वांत मोठा स्स्रोत संयुक्त अरब अमिराती असून, एकूण रेमिटन्समधील 18 टक्के हिस्सा येथून आला आहे.
- भारताने फेब्रुवारी 2023 मध्ये केलेल्या मुक्त व्यापार कराराचा फायदा झाला आहे.
- युएईव्यतिरिक्त सौदी अरेबिया, कुवेत, ओमान आणि कतारचा भारताच्या एकूण रेमिटन्समधील वाटा 11 टक्के इतका आहे.
- तेलाच्या घसरलेल्या किमती आणि उत्पादनात कपात यामुळे आखाती देशांमधून (गल्फ को-ऑपरेशन काउन्सिल) येणारा रेमिटन्स कमी झाला आहे.
- भारताला 2024 मध्ये 124 अब्ज डॉलरचा रेमिटन्स मिळण्याचा अंदाज आहे, तर आर्थिक वर्ष 2025 मध्ये रेमिटन्समध्ये 4 टक्क्यांनी वाढ होऊन तो 129 अब्ज डॉलरवर जाईल.
- संयुक्त अरब अमिराती (युएई) व सिंगापूरसारख्या देशांशी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) जोडण्याच्या भारताच्या प्रयत्नांमुळे पैसे पाठविण्याचा खर्च कमी होईल आणि रेमिटन्सला गती मिळेल, असेही जागतिक बँकेच्या वतीने सांगण्यात आले.
सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारे पहिले पाच देश
1) भारत – 120 अब्ज डॉलर
2) मेक्सिको – 66 अब्ज डॉलर
3) चीन – 50 अब्ज डॉलर
4) फिलिपिन्स – 39 अब्ज डॉलर
5) पाकिस्तान – 27 अब्ज डॉलर
स्थलांतरित होणाच्या बाबतीतही भारताची आघाडी
- देशातून स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांच्याबाबतीतही भारताने आघाडी घेतली आहे. भारतातून 2023 मध्ये 1 कोटी 87 लाख भारतीय नागरिक स्थलांतरीत झाले असून, त्यानंतर युक्रेनचा क्रमांक लागतो.
- युक्रेन मधून 1 कोटी 19 लाख नागरिक स्थलांतरीत झाले आहेत.
- चीनमधून 1 कोटी 11 लाख नागरिक देशाबाहेर गेले असून चीन तिसऱ्या स्थानावर आहे.