वाहनांच्या रस्ता सुरक्षा मानांकमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने देशातील स्वनिर्मित पहिला क्रॅश चाचणी उपक्रम ‘भारत एन- कॅप’ ची सुरुवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आली. 5 टना पर्यंतच्या वजनाच्या मोटारींची क्रॅश चाचणी घेणार हा उपक्रम आहे. ‘भारत एन- कॅप’ 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहे. (एन -कॅप ) – न्यू कार असेसमेंट प्रोग्राम हा भारताचा स्वतःचा क्रॅश चाचणी कार्यक्रम आहे. आणि परदेशात कार्यान्वित असलेल्या चाचण्यांपेक्षा स्वस्त आहे. यामुळे ग्राहकांना त्या उत्पादनाची गुणवत्ता समजून घेण्यास आणि खरेदीचा निर्णय घेण्यास मदत होईल. परदेशात अशा क्रॅश चाचणीच्या खर्च 2.5 कोटी रुपये आहे आणि भारतात तो केवळ 60 लाख रुपये आहे त्यामुळे चांगली बाजारपेठ विकसित होणार आहे. भारतीय वाहन उद्योग 12.50 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.


