हुगळी नदीकिनारी ‘गार्डन रिच शिप बिल्डर्स इंजिनियर्स लिमिटेड’ केंद्रात भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत’ निर्मित ‘विंध्यगिरी’ या सहाव्या युद्धनौकेचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले. योजनेनुसार एकूण सात युद्ध नौकांची निर्मिती करण्यात येणार आहे. यापैकी ‘विंध्यगिरी’ ही सहावी आहे. याआधी पाच युद्ध नौकांचे जलावतरण 2019 ते 2022 दरम्यान करण्यात आले. कोलकाता येथील जीआरएसई या युद्धनौका निर्मात्याने ‘प्रोजेक्ट 17 अल्फा’ या योजनेअंतर्गत तयार केलेली ही तिसरी आणि अखेरची युद्धनौका आहे.
आयएनएस विंध्यगिरीची वैशिष्ट्ये:
कर्नाटकातील पर्वतरांगेवरून विंध्यगिरी हे नाव ठेवण्यात आले. शिवालिक श्रेणीतील ही एक फॉलोऑन युद्धनौका आहे. शत्रूपासून बचाव करण्याची क्षमता, अत्याधुनिक रडार, पाणबुडीविरोधी प्रणाली आणि अत्याधुनिक सेंसरयुक्त ‘ बराक 8 ‘आणि ‘ब्राह्मोस ‘क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता निर्मितीमध्ये 75% स्वदेशी उपकरणांचा वापर ‘ प्रोजेक्ट 17 अल्फा’ अंतर्गत माझगाव डॉक लिमिटेड आणि जीआरएसई तर्फे तयार करण्यात येणारी सहावी युद्ध नौका. ‘प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत ‘सात युद्ध नौकांची निर्मिती.
त्यांची नावे :-
निलगिरी ,उदयगिरी,दुनागिरी ,तारागिरी, हिमगिरी आणि महेंद्रगिरी. यापूर्वी ‘आयएनएस विंध्यगिरी’ने 31 वर्ष देशाची सेवा केली.
आयएनएस विंध्यगिरी:-
एकूण भारवहन क्षमता :- 6,670 टन
युद्धनौकेची लांबी :- 150 मीटर
युद्धनौकेची उंची:- 37 मीटर
ताशी वेग:- 52 किलोमीटर


