- ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 15 वर्षांच्या यशस्वी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सांगता केली.
- अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे टी-20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर त्याने फारसा गाजावाजा न करता हा निर्णय जाहीर केला.
- 2021मध्ये टी-20 वर्ल्ड कपचे जेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरुद्ध अनपेक्षित पराभव पत्करावा लागला.
- 37वर्षीय वॉर्नरने 2009मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण केले होते.
- भारताविरुद्धच्या पराभवाचा सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. गेल्या वर्षीच्या वन-डे वर्ल्ड कपमधील फायनलनंतर त्याला वन-डे मध्ये संधी मिळाली नाही.
- 2024 मध्ये जानेवारी महिन्यातील पाकिस्तान विरुद्धची कसोटी ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी होती.