● ब्रिटनच्या सांस्कृतिकमंत्री ब्रिटनच्या सांस्कृतिकमंत्री लिसा नंदी यांनी कथाकारांसाठी नव्यानेच सुरू करण्यात आलेला ‘आयजीएफ आर्चर-अमिश पुरस्कार’ डॉक्टर-लेखिका शालिनी मलिक यांना प्रदान केला.
● त्यांच्या ‘द वे होम’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला असून, पुरस्कारामध्ये 25 हजार डॉलरचा समावेश आहे.
● लंडनमधील ‘इंडिया ग्लोबल फोरम’ (आयजीएफ) ‘यूके-इंडिया वीक’मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
● गोव्यात राहण्यासाठी जागा शोधणारी तीन तरुण मुले यांच्याबद्दलची ‘द वे होम’ ही कादंबरी आहे.
● दुःख, आत्मशोध आणि गतिमानता या वैशिष्ट्यांवर या कादंबरीची निवड करण्यात आली.
● शालिनी मलिक या श्वसनरोग तज्ज्ञ असून, त्यांनी लेखनाचा छंद जोपासला आहे. गेल्या वर्षी ‘आयजीएफ’ शिखर परिषदेत आर्चर अमिश-पुरस्कार सुरू झाला.
● समकालीन भारतीय काल्पनिक कथांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
● आधुनिक भारतातील विविधता आणि गतिमानता ज्यातून प्रतिबिंबित होते अशा कथांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे