Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘शासन आपल्या दरी’ उपक्रमाला ‘स्कॉच’ पुरस्कार जाहीर

‘शासन आपल्या दरी’ उपक्रमाला 'स्कॉच' पुरस्कार जाहीर

रॉड्री ठरला बॅलन डीओर पुरस्काराचा मानकरी

  • स्पेनआणि मँचेस्टर सिटीचा तारांकित मध्यरक्षक रॉड्री फुटबॉलविश्वात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बॅलन डी’ ओर पुरस्काराचा  मानकरी ठरला आहे.
  • त्यानेव्हिनिशियस ज्युनियर, ज्युड बेलिंगहॅम आणि डॅनी कार्वाहाल या रेयाल माद्रिदच्या नामांकित खेळाडूंना मागे टाकत या पुरस्कारावर मोहोर उमटवली.
  • रॉड्रीगेल्या काही वर्षांपासून सर्वोत्तम बचावात्मक मध्यरक्षक (डिफेंसिव्ह मिडफिल्डर) मानला जातो.
  • बॅलनडी’ओर जिंकणारा स्पेनचा तिसरा फुटबॉलपटू
  • 28 वर्षीयरॉड्री हा बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकणारा स्पेनचा तिसरा फुटबॉलपटू ठरला आहे. यापूर्वी अल्फ्रेडो डी स्टेफानो (1957 आणि 1959) आणि लुईस सुआरेझ (1960) यांनी स्पेनसाठी हा मोठा पुरस्कार जिंकला होता.

महिलांमध्ये एताना बोनमाटी पुरस्काराची मानकरी

  • स्पेनआणि बार्सिलोनाची मध्यरक्षक एताना बोनमाटी सलग दुसऱ्यांदा महिलांमध्ये बॅलन डी’ ओर पुरस्काराची मानकरी ठरली.
  • 2023 मध्येहीतिने हा पुरस्कार पटकावला होता.
  • बार्सिलोनामहिला संघाने गतहंगामात स्पॅनिश लीग, स्पॅनिश चषक आणि चॅम्पियन्स लीग जिंकून तिहेरी यश मिळवले. यात बोनमाटीची भूमिका महत्त्वाची ठरली.
  • फ्रान्सफुटबॉल मासिकातर्फे 1956 सालापासून पुरुष गटात, तर 2018 सालापासून महिला गटात बॅलन डी’ ओर पुरस्कार दिला जात आहे.
  • लिओनेलमेस्सी हा आठ विजेतेपदांसह बॅलोन डी’ओर सर्वाधिक वेळा जिंकला आहे
  • क्रिस्टियानोरोनाल्डो त्याच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने पाच वेळा तो जिंकला आहे, तर मिशेल प्लॅटिनी, जोहान क्रुफ आणि मार्को व्हॅन बास्टेन यांनी प्रत्येकी तीन वेळा जिंकला आहे.

शासन आपल्या दरीउपक्रमाला ‘स्कॉचपुरस्कार जाहीर

  • मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला प्रतिष्ठित ‘स्कॉच’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • देशभरातीलविविध श्रेणींमधील 280 प्रकल्पांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ वर परीक्षकांनी शिक्कामोर्तब केले.
  • यामुळेनागरिकांना सेवा पुरवणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रारूपाची देशात प्रशंसा झाली आहे.
  • शासनाच्याविविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत नेऊन त्याचे जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाने वर्षभर यशस्वीरीत्या चालवला.
  • त्याद्वारेनागरिकांना पाच कोटीहून अधिक लाभ देण्यात आले आहेत .
  • गेल्यावर्षी 15 मे रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता.
  • महाराष्ट्राच्याया उपक्रमाचे स्कॉच पुरस्काराच्या नागरिक केंद्रित प्रशासन या श्रेणीत 80 हून अधिक उपक्रमांना मागे टाकत अंतिम फेरी गाठत पुरस्कार पटकाविला.
  • मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी प्रत्येक ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला व्यक्तिशः हजेरी लावली आहे.
  • उपक्रमाचेमहत्व लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करून राज्यभर एक समर्पित टीम तयार करून तो राबविण्यात आला.
  • ‘शासनआपल्या दारी’ने सार्वजनिक सेवा वितरणातील एक उदाहरण देशासमोर निर्माण केले आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘स्कॉच’ पुरस्कार मिळाल्यावर व्यक्त केली.
  • स्कॉचपुरस्कार वितरणाचा कार्यक्रम 30 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
  • स्कॉचपुरस्कार अनुकरणीय नेतृत्व क्षमता प्रदर्शित करून समाजात आणि प्रशासनात वंदनीय परिवर्तनासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची ओळख करून सकारात्मक सामाजिक-आर्थिक बदल घडवून आणण्याच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहेत.

जेष्ठ लेखिका डॉ. वीणा देव यांचे निधन

  • लेखन, संकलन, संपादनअसे साहित्य प्रकार लीलया हाताळण्याबरोबरच अभिवाचनाच्या माध्यमातून अभिजात साहित्याच्या प्रचारामध्ये योगदान देणाऱ्या ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या विद्यार्थिप्रिय प्राध्यापिका डॉ. वीणा विजय देव  यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
  • त्याज्येष्ठ लेखक गो. नि. दांडेकर यांच्या कन्या होत.

अल्पपरीचय

  • विनादेव यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1948 रोजी झाला.
  • विनादेव या महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या सदस्य होत्या.
  • ठाणेजिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
  • मुलाखतकारसूत्रसंचालन या माध्यमातून त्यांचा आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील कार्यक्रमात सहभाग होता .
  • मोरयागोसावी जीवन गौरव पुरस्कार तसेच साईरंग प्रतिष्ठान तर्फे कर्तुत्व गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

वीणा देव यांची साहित्यसंपदा

  • ‘कधीकधी’ (लेखसंग्रह)
  • ‘परतोनी पाहे’ (लेखसंग्रह)
  • ‘स्त्रीरंग’ (लेखसंग्रह)
  • ‘विभ्रम’ (लेखसंग्रह)
  • ‘स्वान्सीचेदिवस’ (लेखसंग्रह)
  • ‘स्मरणेगोनिदांची’ (स्मरणग्रंथ)
  • यशवंतदेव (चरित्र संपादन)
  • डॉ. ह. वि. सरदेसाई(चरित्र संपादन)

माजी न्यायमूर्ती के. एस पुट्टास्वामी यांचे निधन

  • कर्नाटकउच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. एस. पुट्टास्वामी यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले.
  • 2012 सालीतत्कालीन केंद्र सरकारने सुरु केलेल्या आधार योजनेला के. एस पुट्टास्वामी यांनी विरोध केला होता. तसेच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.
  • याचसुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने 2017 साली खासगीपणाचा अधिकार हा घटनात्मक अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता.
  • के. एसपुट्टास्वामी यांचा जन्म 1926 साली बंगळुरूमध्ये झाला होता. कायद्याची पदवी घेतल्यानंतर 1952 साली त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
  • त्यानंतर1977 मध्ये ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून रुजू झाले.
  • 1986 मध्येनिवृत्त झाल्यानंतर त्यांची केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या बंगळुरू खंडपीठाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • त्यांनीआंध्रप्रदेश मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
  • 2012 मध्येतत्कालीन यूपीए सरकारने आधार योजना आणली होती. या योजनेला के. एस पुट्टास्वामी यांनी विरोध केला होता. याद्वारे नागरिकांच्या खासगीपणाचे उल्लंघन होत असल्याचे ते म्हणाले होते.
  • तसेचया योजनेविरोधात त्यांनी सर्वोच्च्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आधार योजनेला कायदेशीर मान्यता दिली.
  • महत्त्वाचेम्हणजे यावेळी न्यायालयाने खासगीपणाचा अधिकार हा घटनात्मक अधिकार आहे की नाही, हे तपासण्यासाठी 9 न्यायमूर्तींच्या समावेश असलेल्या घटनापीठाची स्थापना केली होती.
  • 2017 मध्येया घटनापीठाने खासगीपणाचा अधिकार हा घटनात्मक अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *