- भारताचा अनुभवी हॉकी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने 18 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीला पॅरिस ऑलिम्पिकनंतर पूर्णविराम देण्याचा निर्णय जाहीर केला.
- श्रीजेश चौथ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळत असून, अनेक राष्ट्रकुल आणि विश्वचषक स्पर्धेसह तब्बल 328 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव श्रीजेशकडे आहे.
श्रीजेशची कारकीर्द
- 2006 दक्षिण आशियाई स्पर्धेतून पदार्पण
- 2011, 2016, 2018, 2023 आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत विजेतेपद
- 2014, 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, 2018 मध्ये कांस्य
- 2016, 2018 चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत रौप्यपदक
- 2019 ‘एफआयएच’ हॉकी लीगमध्ये विजेतेपद
- 2020 टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक
- 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक
श्रीजेशचा सन्मान
- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (2021)
- वर्षातील सर्वोत्कृष्ट जागतिक खेळाडू (2021)
- ‘एफआयएच’चा सलग दोन वर्षे सर्वोत्कृष्ट गोलरक्षक (2021 व 2022)