श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी हरिणी अमरसूर्या
- श्रीलंकेचेनवे अध्यक्ष अनुरा दिसनायके यांनी देशाच्या पंतप्रधानपदावर हरिणी अमरसूर्या यांची नियुक्ती केली आहे.
- यापदावर नियुक्ती झालेल्या त्या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला आहेत.
- याआधीसिरिमाओ भंडारनायके,चंद्रिका कुमारतुंगा,श्रीलंकेच्या महिला पंतप्रधान होत्या.
- अमरसूर्याया नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाच्या नेत्या आहेत.
- खातेवाटपातत्यांच्याकडे न्याय, शिक्षण, कामगार, उद्योग, आरोग्य आणि गुंतवणूक अशी महत्त्वाची खाती आली आहेत.
अमरसूर्या यांच्याविषयी
- उजव्याविचारांच्या कार्यकर्त्या
- विद्यापीठातप्राध्यापक
- शैक्षणिकआणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत कार्यरत
- दिल्लीतीलहिंदू कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण
- ऑस्ट्रेलियातउपयोजित मानववंशशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण
- सामाजिकमानववंशशास्त्र विषयात एडिंबरा विद्यापीठातून पीएच.डी.
37व्या अखिल भारतीय टपाल बुद्धिबळ स्पर्धा-2024
- महाराष्ट्रआणि गोवा परिमंडळ टपाल क्रीडा मंडळ 37 व्या अखिल भारतीय टपाल बुद्धिबळ स्पर्धा-2024 चे यजमानपद भूषवत आहे.
- गोव्यातपणजी इथे मेनेझेस ब्रगॅन्झा संस्थेच्या सभागृहात ही स्पर्धा होत आहे.
- 23 सप्टेंबररोजी मुख्य अतिथी म्हणून गोव्याचे मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळरणकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. ही स्पर्धा 27सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
- यास्पर्धेनिमित्त 37 वी अखिल भारतीय टपाल बुद्धिबळ स्पर्धा-2024 विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन करण्यात आले. पहिले पाकीट अमिताभ सिंह यांच्या हस्ते मंत्री हळरणकर यांना देण्यात आले.
- देशातील20 टपाल परिमंडळातील एकूण 121 खेळाडू या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उतरले आहेत.
- सहभागीपरिमंडळांमध्ये आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, दिल्ली, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ईशान्य, ओदिशा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.
- स्पर्धेसाठीमुख्य पंच अरविंद म्हामळ हे जोत्स्ना सारीपल्ली, आशा शिरोडकर आणि सुधाकर परगार या उपपंचासह परीक्षण करत आहेत.
- नवीदिल्लीतील टपाल महासंचालनालयाचे सहाय्यक महासंचालक (प्रशासन) विनायक मिश्रा यांची मुख्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- लोकेशकुमार मीना यांना तांत्रिक प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आले आहे.
गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर उद्घाटन सोहळ्याला मानद अतिथी म्हणून उपस्थित होते.