53व्या विजय दिवसाच्या निमित्ताने 16 डिसेंबर रोजी दक्षिण कमांड मुख्यालयाच्यावतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC), पुणे येथे भव्य ‘सदर्न स्टार विजय दौड 2023’ चे आयोजन करण्यात आले आहे.
उद्देश
• सदर्न स्टार विजय रन 2023 ही दौड ही 1971 च्या युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलातील शूरवीर आणि जखमी सैनिकांच्या सन्मानार्थ आयोजित केली जाते.
• या दौडमध्ये समाजाच्या सर्व स्तरातून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि हे 1971 च्या युद्धामधील हुतात्मा सैनिक आणि नागरिकांच्या दृढ ऐक्याचे प्रतीक आहे.
सदर्न स्टार विजय दौड 2023 मध्ये नागरिकांसाठी ‘सैनिकांसाठी दौड, सैनिकांसोबत दौड’ ही एक अनोखी संधी असून ऐतिहासिक 190 वर्ष जुन्या पुणे रेसकोर्सवर या दौडला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
प्रत्येक नोंदणीकृत धावपटूला ड्राय फिट रन टी-शर्ट, फिनिशर बॅज, पौष्टिक नाश्ता, हायड्रेशन पॅक आणि वैद्यकीय सहाय्य मिळेल. हा कार्यक्रम सर्व स्तरातील लोकांना सैनिकांच्या बरोबरीने आणि लष्करी जीवनशैलीचा अनुभव घेण्याची संधी देईल.


