Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

सर्वाधिक कर भरण्याच्या यादीत शाहरुख खान अव्वलस्थानी

सर्वाधिक कर भरण्याच्या यादीत शाहरुख खान अव्वलस्थानी

चित्रकार पराग बोरसे यांना अमेरिकेचा प्रतिष्ठित पुरस्कार

  • कर्जतचेचित्रकार पराग बोरसे यांना अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीने  2024 चा ‘फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • एकहजार अमेरिकन डॉलर्स आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • 22 सप्टेंबर2024 रोजी मॅनहॅटन, न्यूयॉर्क येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
  • न्यूयॉर्कमध्येभरणाऱ्या ‘एंडूरिंग ब्रिलियंस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या वार्षिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे हे 52 वें वर्ष आहे.
  • यावर्षीअमेरिकेच्या पेस्टल सोसायटीला जगभरातून 1155 सबमिशन प्राप्त झाली होती.
  • यापैकी125 कलाकृती प्रदर्शनासाठी निवडल्या गेल्या आहेत.
  • यातपराग बोरसे यांचे सॉफ्ट पेस्टल या माध्यमातून चितारलेले ‘ए टर्बन गेझ’ हे एका फेटा घातलेल्या धनगराचे व्यक्ती चित्राचा समावेश आहे.
  • पेस्टलसोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेची फ्लोरा बी गुफिनी यांनी 1972 मध्ये स्थापना केली.
  • हीअमेरिकेतील सर्वात जुनी कला संस्था आहे.
  • अमेरिकनकलाजगतामधील पेस्टल माध्यमाच्या पुनर्जागरणाचे श्रेय मुख्यत्वे याच संस्थेला जाते.
  • न्यूयॉर्कमधीलद नॅशनल आर्ट्स क्लब मध्ये भरणारे या संस्थेचे वार्षिक प्रदर्शन हे जगभरातील कलाकारांसाठी मुख्य आकर्षण असते.
  • कलावंताचीतांत्रिक कुशलता आणि सृजनशीलता हा निवड प्रक्रिये मधील प्रमुख निकष असतो.
  • दनॅशनल आर्ट्स क्लब, 15 ग्रामर्सी पार्क, दक्षिण न्यूयॉर्क येथे 3 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2024 या काळात हे प्रदर्शन कला रसिकांसाठी खुले असणार आहे.
  • परागबोरसे हे एकमेव भारतीय कलाकार आहेत ज्यांच्या कलाकृतीची या संस्थेने आपल्या वार्षिक प्रदर्शनासाठी चार वेळा निवड केली आहे. तसेच अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या पेस्टल जरनल या मॅक्झिनने सुद्धा त्यांना दोन वेळा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

धरमबीरला आशियाई विक्रमासह सुवर्णपदक

  • भारतीयखेळाडूंनी पॅरिस पॅरालिंपिकमधील क्लब थ्रो या क्रीडा प्रकारात सुवर्ण व रौप्यपदकांची कमाई केली.
  • धरमबीरयाने आशियाई विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर प्रणव सुरमा याने रौप्यपदकावर मोहोर उमटवली.
  • क्लब थ्रो या खेळात भारताला पहिल्यांदाच पदक पटकावता आले.
  • क्लबथ्रो (एफ 51) या प्रकारात जगभरातील 10 खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले होते.
  • धरमबीरयाचे पहिले चार प्रयत्न अपयशी ठरले. त्याने पाचव्या प्रयत्नात92मीटर दूर लाकडी दांडू (क्लब) फेकला.
  • हाथ्रो त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला कारण याच थ्रोने त्याला सुवर्णपदक मिळवून दिले.
  • भारताच्याप्रणव सुरमा याने पहिल्याच प्रयत्नात59 मीटर दूर लाकडी दांडू टाकत रौप्यपदक पटकावले.

  क्लब थ्रो खेळ प्रकार

  • भालाफेक, गोळाफेक, थाळीफेकयाचप्रमाणे क्लब थ्रो हा खेळ खेळला जातो.
  • याखेळामध्ये सहभागी होणारे खेळाडू लाकडी दांडू (साधारण मुदगलच्या आकाराचा) हातामध्ये घेऊन तो फेकून देतात.
  • त्यानंतरतो दांडू कुठपर्यंत पोहोचला याचे अंतर मोजले जाते.
  • लाकडीदांडू सर्वाधिक दूर फेकणाऱ्या खेळाडूंना पदकांवर मोहोर उमटवता येते.

भारत – सिंगापूरमध्ये चार क्षेत्रांत करार

  • सिंगापूरदौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी  सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स ओंग यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली ओम हे पीपल्स ऍक्शन पार्टीचे नेते आहेत.

चार क्षेत्रांत करार

  • भारतआणि सिंगापूरदरम्यान डिजिटल तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, आरोग्य आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमधील सहकार्यासाठी सामंजस्य करार झाले.
  • डिजिटलतंत्रज्ञान क्षेत्रातील कराराद्वारे दोन्ही देश सायबर सुरक्षा, फाइव्ह-जी यांच्यासह सुपर कॉम्प्युटिंग, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धीमत्ता या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करणार आहेत.
  • भारतातसेमिकंडक्टर क्लस्टर निर्माण करण्यासाठीही सिंगापूर मदत करणार असून गुंतवणूकही करणार आहे.
  • आरोग्यक्षेत्रात संशोधनासाठी दोन्ही देश एकमेकांना मदत करणार असून भारतीय डॉक्टरांना सिंगापूरमध्येही कामाची संधी मिळणार आहे.
  • भारतातीलकौशल्यविकासासाठीही सिंगापूरची मदत घेतली जाणार आहे.

सर्वाधिक कर भरण्याच्या यादीत शाहरुख खान अव्वलस्थानी

  • शाहरुखखान हा देशातील सर्वाधिक कर भरणारा सेलिब्रिटी ठरला आहे.
  • त्यांनी92 कोटी रुपयांचा कर भरला आहे.
  • ‘फॉर्च्यूनइंडिया’ने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर केली.

सर्वाधिक कर भरणारे पहिले पाच सेलेब्रिटी

1) शाहरुख खान –  92 कोटी रु.

2) थलपती विजय – 80 कोटी रु

3) सलमान खान – 75 कोटी रु

4) अमिताभ बच्चन – 71 कोटी रु.

5) विराट कोहली – 66 कोटी रु.

चौथा सर्वांत श्रीमंत अभिनेता

  • सर्वाधिककमाईसह शाहरुख खान जगातील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता बनला आहे.
  • कमाईच्याबाबतीत शाहरुखने जॅकी चॅन (₹३३५९ कोटी) आणि टॉम क्रूझ (₹५०३९ कोटी) यांना मागे टाकले आहे.
  • करिना कपूर ही देशातील सर्वाधिक कर भरणारी महिला सेलिब्रिटी ठरली आहे.
  • अभिनेत्रीने 2023 -24 या आर्थिक वर्षात 20 कोटी रुपयांचा कर भरला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *