महाराष्ट्र भ्रष्टाचारात सलग तिसऱ्या वर्षी देशात पहिल्या स्थानावर आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असलेल्या राज्यांची यादी जाहीर करण्यात आली .
● महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वाधिक 749 लाच प्रकरणावर कारवाई केली आहे.
● महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शासकीय विभागावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.
● पोलीस विभाग, महसूल विभाग, महापालिका आणि मंत्रालय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक लाच मागितल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
● देशात महाराष्ट्रनंतर दुसऱ्या स्थानावर राजस्थान (511), तिसऱ्या स्थानावर कर्नाटक (389), चौथ्या स्थानावर मध्य प्रदेश (294) आणि पाचव्या स्थानावर ओडिशा (287) आहे.


