- न्या. नॉन्गमेकापम कोटेश्वर सिंह आणि न्या. आर माधवन यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली.
- त्यांनी शपथ घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 म्हणजे मंजुरीइतकी होईल.
- न्या. एन कोटेश्वर सिंह हे जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असून सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होणारे मणिपूरमधील पहिले न्यायाधीश आहेत.
- “न्या. सिंह यांच्या नियुक्तीमुळे ईशान्य भारताला प्रतिनिधित्व मिळेल आणि विशेषतः ते सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होणारे मणिपूरमधील पहिले न्यायाधीश असतील.
- न्यायाधीश सिंह यांची ऑक्टोबर 2011 मध्ये गौहत्ती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
- मणिपूर उच्च न्यायालयाची निर्मिती झाल्यानंतर त्यांची तिकडे बदली करण्यात आली होती.
- गेल्या वर्षी फेब्रुवारी – महिन्यात त्यांची जम्मू आणि – काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.
- ते फेब्रुवारी 2028 पर्यंत कार्यरत राहतील.
- न्या. आर माधवन हे मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश – म्हणून काम पाहत आहेत.
- ते जून 2028 पर्यंत कार्यरत राहतील