प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या यादीनुसार पोलिस, अग्निशमन दल, होमगार्ड,नागरी संरक्षण इ. मधील एकूण 1 हजार 132 कर्मचाऱ्यांना शौर्य किंवा सेवा पुरस्कारांनी प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. सहा जणांना कीर्तीचक्र जाहीर झाले असून त्यापैकी तिघांना तो सन्मान मरणोत्तर जाहीर झाला आहे.
अधिक माहिती
● कॅप्टन अंशुमन सिंह (पंजाब रेजिमेंट, 26 वी बटालियन), हवालदार अब्दुल माजिद (पॅराशूट रेजिमेंट, 9वी बटालियन) आणि शिपाई पवनकुमार (राष्ट्रीय रायफल्स, 55 वी बटालियन) यांना मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर झाले आहे.
● मेजर दिग्विजयसिंह रावत (पॅराशूट रेजिमेंट, 21 वी बटालियन, विशेष दल), मेजर दीपेंद्र विक्रम बसनेत (शीख रेजिमेंटमधील चौथी बटालियन), हवालदार पवनकुमार यादव (महार रेजिमेंट 21वी बटालियन) यांना कीर्तिचक्र जाहीर झाले आहे.