राज्यातील या वर्षाच्या ऊस गळीत हंगामातील साखर उताऱ्यात पुन्हा एकदा कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे. त्यामुळे साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. या विभागाचा साखर उतारा हा सध्या 11.2 % इतका आहे. यामध्ये पुणे विभागाने राज्यात दुसरे स्थान पटकाविले असून, पुणे विभागाचा सध्याचा साखर उतारा हा 10.13 % इतका आहे. ऊस गळीत हंगामात आतापर्यंत एकूण 207 सहकारी साखर कारखाने सुरू झाले असून, यापैकी 103 सहकारी आणि 104 खासगी कारखाने आहेत. या सर्व कारखान्यांची मिळून रोजची एकूण ऊस गाळप क्षमता ही 94 लाख 9 हजार 150 मेट्रिक टन इतकी आहे. या सर्व कारखान्यांनी मिळून आतापर्यंत एकूण 798 लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. राज्यात सर्वाधिक साखर उतारा हा कोल्हापूर विभागाचा तर, सर्वांत कमी म्हणजे केवळ 4.98 टक्के साखर उतारा नागपूर विभागाचा आहे.
विभागनिहाय साखर उतारा
● कोल्हापूर – 11.2%
● पुणे – 10.13%
● नांदेड – 9.79%
● नगर – 9.54%
● अमरावती – 9.11%
● सोलापूर- 9.04%
● छत्रपती संभाजी नगर – 8.52%
● नागपूर – 4.98%