सिंगापूरच्या युनायटेड पेट्रोचा ओडिशा सरकारशी करार
- सिंगापूरच्या युनायटेड पेट्रो ग्रुप तसेच मुंबईच्या सधव शिपिंग लिमिटेडने ओडिशामध्ये जहाज निर्मिती व्यवस्थेसाठी ओडिशा सरकारशी करार केला आहे.
- नुकताच भुवनेश्वरमध्ये झालेल्या मेक इन ओडिशा परिषदेत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- युनायटेड पेट्रोचे संचालक ससेथरन देवगर, सधव शिपिंगचे सीईओ वेदान्त चौधरी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
- यानुसार ओडिशाच्या किनाऱ्यावर जहाजबांधणी तसेच जहाज दुरुस्ती आणि देखभाल केंद्र उभारले जाणार आहे.
- त्याचप्रमाणे जहाजांसाठी इंधन व्यवस्था, सुकी गोदी तसेच साठवणूक केंद्र आणि अन्य यंत्रणा उभारली जाणार आहे.