- फुटबॉलमधील सुपरस्टार व हॉलिवूड अभिनेता ओ. जे. सिम्पसन यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले.
- फुटबॉल व सिनेमा या दोन्ही क्षेत्रांमधून सिम्पसन यांना पैसा व प्रसिद्धी मिळाली.
- मात्र 1994 मध्ये जून महिन्यात त्यांनी आपली पत्नी निकोल ब्राऊन व तिचा प्रियकर रोनाल्ड गोल्डमन यांची हत्या केली.
- सिम्पसन यांचा जन्म 9 जुलै, 1947मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे झाला.
- ते सरकारच्या प्रकल्पांमधील घरात वास्तव्य करीत लहानाचे मोठे झाले.
- शिक्षणात लक्ष नसल्यामुळे त्यांनी महाविद्यालयात असताना फुटबॉलकडे विशेष लक्ष दिले.