● केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विद्यमान संचालक प्रवीण सूद यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 24 मे रोजी संपणार होता.
● केंद्र सरकारच्या उच्चाधिकार निवड समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार प्रवीण सूद यांचा कार्यकाळ मे 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
● सीबीआय संचालकांच्या निवडीबाबत मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक झाली होती.
● समितीचे सदस्य असलेले सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते.
● समितीच्या शिफारशींच्या आधारे मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) मुदतवाढीला मान्यता दिली होती.
● भारतीय पोलिस सेवेचे 1986 च्या तुकडीचे अधिकारी असलेले प्रवीण सूद हे कर्नाटक केडरचे आहेत.
● कर्नाटकात पोलिस महासंचालक म्हणून काम केल्यानंतर 25 मे 2023 रोजी सीबीआय प्रमुख म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता.