- तमिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे माजी खासदार सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे 24 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे.
- ते सध्या झारखंड आणि तेलंगणचे (अतिरिक्त कार्यभार) राज्यपाल आहेत.
- तसेच महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- राज्यपाल रमेश बैस यांची राज्यपालपदाची मुदत संपुष्टात आली. त्यांच्या जागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- गेले चार महिने दोन राज्यांच्या राज्यपालपदाचा कार्यभार ते सांभाळत आहेत.
सी .पी. राधाकृष्णन:
- ज्येष्ठ भाजप नेते सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.
- दक्षिणेतील भाजपचा चेहरा म्हणून राधाकृष्णन त्यांच्याकडे पाहिले जाते.
- त्यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तिरुपूरमध्ये झाला.
- वयाच्या 16 व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम सुरू केले.
- गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ ते भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय आहेत.
- राधाकृष्णन भाजपच्या तिकिटावर दोन वेळा तमिळनाडूच्या कोइमतूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले आहेत; तसेच त्यांनी काही वर्षे तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
- सन 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. मात्र, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असूनही ते पराभूत झाले होते.
- 18 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती.
- त्यानंतर दीड वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
- राधाकृष्णन यांचा दक्षिण भारतातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांमध्ये उल्लेख केला जातो.
नवीन नेमणूक झालेले 9 राज्यांचे राज्यपाल
राज्यपाल राज्य
1) सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्र
2) हरिभाऊ बागडे राजस्थान
3) संतोषकुमार गंगवार झारखंड
4) रमण डेका छत्तीसगड
5) सी. एच. विजयशंकर मेघालय
6) ओमप्रकाश माथूर सिक्कीम
7) गुलाबचंद कटारिया पंजाब, चंडीगड
8) लक्ष्मण प्रसाद आचार्य आसाम, मणिपूर
(अतिरिक्त कार्यभार)
9) जिष्णु देव वर्मा तेलंगण



