‘सूर्यघर‘मध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी
- ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’त 10 लाख 9हजार घरांवर सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी पूर्ण झाली असून, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.
- राज्यात 1 लाख 92हजार 936घरांच्या छतांवर हे प्रकल्प उभारण्यात आले .
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशात ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’चा शुभारंभ 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला.
- या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत 10 मार्च 2025 पर्यंत देशभरात एकूण09लाख सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून,हा एक ऐतिहासिक टप्पा ठरल्याचे बोलले जात आहे.
- देशात 2026-27 पर्यंत 1 कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.
- या योजनेत गुजरात हे पहिल्या स्थानावर आहे
काय आहे पंतप्रधान सूर्यघर योजना?
- पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना ही भारत सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे.
- रुफटॉप सोलरद्वारे देशातील एक कोटी घरांना मोफत वीज पुरवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
- 2024-25 च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली होती. पीएम सूर्यघर योजनेंतर्गत 300 युनिट पर्यंत मोफत वीज लाभार्थी व्यक्तीला मिळणार आहे.
- केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभार्थ्याला 60 %पर्यंत सबसिडी केंद्र शासन तर्फे देण्याची तरतूद केली आहे.पंतप्रधान सूर्यघर योजना ही देशातील एक कोटी लोकांसाठी आहे.