Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

स्टेट बँकेला सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार

स्टेट बँकेला सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार

स्टेट बँकेला सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार

  • ग्लोबलफायनान्स या जागतिक नियतकालिकातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये भारतातील सर्वोत्तम बँक म्हणून स्टेट बँके ऑफ इंडियाचा  नुकताच गौरव करण्यात आला.
  • नियतकालिकाच्या31 व्या वार्षिक सर्वोत्तम बँक पुरस्कार सोहळ्यात स्टेट बँकेचा सन्मान करण्यात आला.
  • पुरस्कारवितरण सोहळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँक यांच्या चालू वर्षातील वार्षिक बैठकांच्या पूर्वसंध्येला अमेरिकेत वॉशिंग्टन येथे झाला.
  • स्टेटबँकेचा हा सन्मान अध्यक्ष सी. – एस. शेट्टी यांनी स्वीकारला.
  • आर्थिकसर्वसमावेशनाला बँकेने दिलेले – उत्तेजन, विविध सेवा यांमुळे ग्राहकांचा जिंकलेला विश्वास यांचे अवलोकन करून  ग्लोबल फायनान्सने बँकेचा हा सन्मान केला.
  • आफ्रिका, आशिया-प्रशांत, कॅरिबिअन, मध्यअमेरिका आणि पूर्व युरोप, लॅटिन अमेरिका, आखाती प्रदेश, उत्तर अमेरिका, पश्चिम युरोप आदी प्रदेशांतील सुमारे 150 देशांतील बँकांचा आढावा या पुरस्कारासाठी ग्लोबल फायनान्स नियतकालिक दरवर्षी घेते.

स्टेट बँक ऑफ इंडिया

  • स्थापना: 1 जुलै 1955
  • अध्यक्ष:सी. एस.शेट्टी
  • मुख्यालय: मुंबई

ग्लोबल फायनान्स

  • ग्लोबलफायनान्स हे इंग्रजी भाषेतील मासिक आर्थिक मासिक आहे. या मासिकाची स्थापना 1987 मध्ये व्हेंचरचे संस्थापक आणि माजी प्रकाशक जोसेफ डी. गियारापुटो , कार्ल जी. बर्गन, स्टीफन स्पॅन, एच. ॲलन फर्नाल्ड आणि पाओलो पनेराईयांचा समावेश असलेल्या संघाने केली होती .
  • मासिकामध्येआर्थिक जागतिकीकरणाचा विषय समाविष्ट आहे आणि अध्यक्ष, सीईओ, सीएफओ, खजिनदार आणि इतर वित्तीय अधिकारी यांना लक्ष्य करते.
  • मासिक158 देशांमध्ये प्रसारित केले जाते आणि जगभरात 50,050 सदस्य आणि प्राप्तकर्ते आहेत.
  • स्थापना: 1987
  • संपादक:अँड्रिया फियानो
  • मुख्यालय: मॅनहॅटन , न्यूयॉर्क शहर , युनायटेड स्टेट्स

पशुगणना 2024 – 25 घोषणा

  • केंद्रीयमत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजू रंजन सिंह यांनी 21 वी पशु गणना लवकरच करण्यात येणार असल्याचे जाहीर केले .
  • त्यानुसारही गणना ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान होणार आहे.

पशुगणना म्हणजे काय?

  • दरपाच वर्षांनी आयोजित केली जाणाऱ्या या गणनेत देशातील पाळीव प्राणी, कुक्कुटपालन आणि भटक्या प्राण्यांच्या संख्या मोजण्यात येते.
  • यामध्येप्राण्यांच्या प्रजाती, जाती, वय, लिंग आणि मालकीची स्थिती याविषयीची माहिती विचारात घेण्यात येते.
  • 1919 पासूनआतापर्यंत एकूण 20 वेळा पशुधन गणना करण्यात आली आहे.
  • मागीलगणना 2019मध्ये करण्यात आली होती.

पशुगणनेचे उद्दिष्ट 

  • ग्रामीणभागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात पशुधन क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते.
  • उत्पादकतेच्यादृष्टीने, विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये, कुक्कुटपालन आणि पशुपालन हे एकूण शेतीच्या एकूण उत्पन्नात 30 टक्के योगदान देतात.
  • 2019 मधीलपशुगणनेपेक्षा वेगळेपण म्हणजे या वेळची गणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात केली जाईल.

2019 च्या पशुगणनेची आकडेवारी

  • गायी: 19 कोटी29 लाख
  • शेळ्या: 14 कोटी88 लाख
  • म्हशी: 10 कोटी98 लाख
  • मेंढ्या: 7 कोटी42 लाख
  • डुकरे: 90 लाख
  • एकूणपशुधन : 53 कोटी 57 लाख

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *