● छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारसा आयुष्यभर जोपासून त्यांचा प्रचार, प्रसार करणारे जेष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी रामचंद्र नरके हे अतुलनीय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची कधीही भरून न येणारे हानी झाली आहे.
● समता परिषदेच्या वतीने हरी नरके यांच्या स्मरणार्थ व त्यांच्या नावाने दरवर्षी पाच जणांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
● नरके यांच्या सर्व ग्रंथांसह इतर 25,000 मौलिक ग्रंथांचे दालन वांद्रे येथील भुजबळ नॉलेज सिटीत संशोधकांसाठी अद्यावत केले जाणार आहे.
● तसेच हरि नरके यांच्या नावाने दरवर्षी शाहू-फुले- आंबेडकर यांच्यावर संशोधन, शोध पत्रकारिता, एक गरीब विद्यार्थी, शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे आणि मागासवर्गीयांसाठी काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता अशा पाच जणांना प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे एकूण पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची घोषणा भुजबळ यांनी केली.


