● अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची निवड झाली.
● आता महामंडळाचे कार्यालयही पुढील तीन वर्षांसाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे (मसाप) आले आहे.
● मावळत्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाची बैठक पुण्यातील ‘मसाप’च्या कार्यालयात झाली.
● साहित्य महामंडळाचे कार्यालय घटक संस्थांकडे प्रत्येकी तीन वर्षे फिरत्या स्वरूपात असते.
● मागे तीन वर्ष ते मुंबई साहित्य संघाकडे होते त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ते आता मसाप कडे हस्तांतरित करण्यात आले.
● आता पुढील तीन वर्ष साहित्य महामंडळाचे कामकाज पुणे या ठिकाणावरून होणार आहे.
● पुढील तीन साहित्य संमेलने या काळात होणार असून यात 99 वे, 100 आणि 101 वे अशा महत्त्वाच्या टप्प्यांवरील संमेलनाचा समावेश असेल.
सर्वांत तरुण अध्यक्ष
● प्रा. मिलिंद जोशी हे वयाच्या 43 व्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष झाले.
● परिषदेच्या इतिहासातील ते सर्वांत तरुण कार्याध्यक्ष आहेत.
● आता वयाच्या 53 व्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे ते महामंडळाच्या इतिहासातील सर्वांत तरुण अध्यक्ष ठरले आहेत.
प्रसिद्ध लेखक आणि वक्ते म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित:
● प्रचंड जनसंपर्क, अफाट व्यासंग, शैलीदार लेखन, अमोघ वक्तृत्त्व, कुशल प्रशासन आणि सकारात्मक साहित्यकारण यामुळे प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांचे नाव महाराष्ट्राला सुपरिचित आहेत.
● सिव्हील इंजिनिअरिंगचे प्राध्यापक असणारे जोशी हे शब्दांचे बांधकाम करण्यातही वाकबगार आहेत. त्यांनी ललितलेखन, कथा, व्यक्तिचित्रे, तत्त्विंचतनपर लेखन, चरित्रे, आत्मपर लेखन अशा विविध वाङ्मयप्रकारात कसदार साहित्यनिर्मिती केली असून त्यांची 17 पुस्तके प्रकाशित आहेत.
● त्यांनी दैनिक सकाळ, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, सामना, नवाकाळ, पुण्यनगरी आदी नामवंत वृत्तपत्रांत स्तंभलेखन केले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ:
● अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करणारी एक शिखर संस्था आहे.
● हे महामंडळ 1961 मध्ये स्थापन झाले, जेव्हा महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद आणि विदर्भ साहित्य संघ यांसारख्या संस्था एकत्र आल्या.
संस्थेचे ध्येय:
● मराठी भाषेचे, साहित्य आणि संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करणे.
● विविध साहित्य संस्थांमध्ये समन्वय साधणे आणि त्यांना सहकार्य करण्यास प्रोत्साहन देणे.
● साहित्य संमेलनाचे आयोजन करणे, जेथे लेखक, साहित्यिक, आणि कलाप्रेमी एकत्र येतात.
● मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवणे.
संस्थेची कार्ये:
● साहित्य संमेलनाचे आयोजन करणे.
● मराठी साहित्य आणि संस्कृती संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे.
● साहित्यिक, लेखक आणि अभ्यासकांना एकत्र आणणे.
● मराठी भाषेच्या विकासासाठी उपाययोजना करणे.
संस्थेचे महत्त्व:
● अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण संस्था आहे.
● हे महामंडळ मराठी साहित्य आणि संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.


