संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) संपूर्ण देशी बनावटीच्या ‘अग्नि 5’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. अग्नि 5 या क्षेपणास्त्राचा पल्ला तब्बल 5 हजार किलोमीटर आहे. विशेष म्हणजे ‘मिशन दिव्यास्त्र’ या मोहिमेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्रात संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एन्ट्री व्हेईकल (एमआयआरव्ही)’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
‘अग्नि 5’ची वैशिष्ट्ये
• क्षेपणास्त्राचा पल्ला 5 हजार किलोमीटर
• चीनच्या अतिउत्तरेकडील भागासह संपूर्ण आशिया, युरोपचा काही भाग क्षेपणास्त्राच्या टप्प्यात
• एकाच क्षेपणास्त्राद्वारे अनेक लक्ष्ये टिपण्याची क्षमता
• स्वदेशी बनावटीची उड्डाण यंत्रणा, अतिसंवेदनशील सेन्सर्स
• वजन – 50 हजार किलो
• उंची – 1.75 मी.
• 1500 किलोची अनवस्त्रे वाहून नेण्याची क्षमता
• ध्वनीपेक्षा 24 पट वेगवान
• एक सेंकदात 8.16 किलोमीटर अंतर कापणार