नव्या पिढीतील ‘अग्नी प्राईम’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची ओडिशा किनारपट्टीवरील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बेटावर संरक्षण संशोधन विकास संस्थेने(DRDO) यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीच्या वेळी क्षेपणास्त्रावर लक्ष ठेवण्यासाठी रडार, टेलीमेटरी आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रेकिंग सिस्टीम तैनात करण्यात आली होती .या चाचणीमुळे या क्षेपणास्त्राच्या सुरक्षा दलातील समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे . अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या या क्षेपणास्त्राने त्याचे निश्चित लक्ष गाठण्यात यश मिळवले. हे क्षेपणास्त्र अग्नि सिरीजमधील आधुनिक, मारक, अचूक आणि मध्यम पल्ल्याचे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र आहे. 11,000 किलो वजनाच्या या क्षेपणास्त्रात 2 हजार किलोमीटर अंतरापर्यंतचे लक्ष सहज भेदण्याची क्षमता आहे . या क्षेपणास्त्रांद्वारे अनेक लक्ष्यांवर हल्ला केला जाऊ शकतो. हे उच्च -तीव्रतेचे स्फोटक थर्मोबॅरिक अथवा आण्विक शस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. अग्नी प्राईम क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी विकासात्मक चाचण्यानंतर युजर्स द्वारे आयोजित केलेले हे पहिले प्रि- इंडक्शन नाईट प्रक्षेपण होते ज्यामुळे सिस्टीमची अचूकता आणि विश्वासहर्ता प्रामाणिक होते. रडार, टेलिमेटरी आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रेकिंग सिस्टीम सारखी अनेक श्रेणी उपकरणे वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली होती. यात वाहनाच्या संपूर्ण प्रक्षेपणाच्या फ्लाईट डेटा घेण्यासाठी टर्मिनल पॉईंटवर दोन डाऊनरेंज जहाजांचा समावेश होता.
अग्नी प्राईम मिसाइलची वैशिष्ट्ये:
- अग्नि सिरीज मधील आधुनिक मारक ,अचूक, आणि मध्यम पल्ल्याचे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र
- 1000 किलो वजनाच्या या क्षेपणास्त्रात 2000 किलोमीटर अंतरापर्यंतचे लक्ष सहज भेदण्याची क्षमता
- या क्षेपणास्त्राद्वारे अनेक लक्ष्यांवर हल्ला केला जाऊ शकतो
- उच्च तीव्रतेचे स्फोटक थर्मोबॅरिक अथवा आण्विक शस्त्र वाहून नेण्यास सक्षम
DRDO :- Defence Research Developement Organization:
स्थापना :- 1958
अध्यक्ष:- समीर व्ही. कामत
मुख्यालय :- नवी दिल्ली
बोधवाक्य:- “बलस्य मूलं विज्ञानम्”


