● भारताने आपल्या वाढत्या लष्करी ताकदीची प्रचिती देताना ‘अग्नी-5’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
● ओडिशातील चंडीपूर येथे या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.
● 5 हजार किमीपर्यंतचे लक्ष्य साध्य करण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-5’ या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथील प्रक्षेपण चाचणी स्थळावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली.
● क्षेपणास्त्राने सर्व परिचालनात्मक आणि तांत्रिक परिमाणांची पूर्तता केली.
● अग्नि -5 हे जमिनीवरुन जमिनीवर मारा करणार एकमेव आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइल आहे.
● अग्नि -5 मारक क्षमता 5000 किलोमीटर पेक्षा अधिक आहे. या रेंजमध्ये संपूर्ण चीन येतो. याशिवय यूरोप आणि आफ्रिकेचा काही भाग देखील येतो.
● या मिसाईलमध्ये मल्टीपल इंडिपेंडेंटी टार्गेटेबल री-एंट्री वेईकल्स तंत्रज्ञानाचा समावेश आहे. म्हणजे हे क्षेपणास्त्र एकदा लाँच केल्यानंतर अनेक टार्गेटवर हल्ला करु शकतं. अग्नि-5 मध्ये दीड टनापर्यंत अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे.
● अग्नि -5 चा वेग मॅक 24 आहे, म्हणजेच आवाजाच्या वेगाच्या 24 पट अधिक आहे. या क्षेपणास्त्राची लाँचिंग यंत्रणा कॅनिस्टर तंत्रज्ञानावर आधारित आहे.
● या कारणामुळं याची वाहतूक करणं देखील सोपं आहे. सध्या भारताशिवाय केवळ आठ देशांकडे इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल आहे.
● रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, इस्त्रायल, ब्रिटन आणि कोरियाचा समावेश आहे.
● अग्नि 5 क्षेपणास्त्र एक प्रगत मल्टीपल इंडिपेंडेंटली- टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल तंत्रज्ञानासह सज्ज आहे.
● सामान्य क्षेपणास्त्रामध्ये केवळ एका ठिकाणी विस्फोटक घेऊन जाण्याची क्षमता असते. तर, MIRV क्षेपणास्त्र एकावेळी अनेक वॉरहेड कॅरी करु शकतात.
● सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच क्षेपणास्त्राद्वारे शेकडो किलोमीटर अंतरावरील अनेक टारगेसवर हल्ला केला जाऊ शकतो. गरज पडल्यास एकाच ठिकाणी अनेकदा हल्ला करता येऊ शकतो.
● अग्नि -5 क्षेपणास्त्र डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून विकसित करण्यात आलं आहे.
● डीआरडीओकडून याची मारक क्षमता 7500 किलोमीटरपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
● 2024 मध्ये 11 मार्च रोजी या इंटरमीजिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती.
● ‘अग्नी’ क्षेपणास्त्र मालिकेतील या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 19 एप्रिल 2012 रोजी घेण्यात आली होती.