Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अदम्य’ ही पहिली जलदगती गस्त नौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल ‘Adamya’, the first fast patrol boat, inducted into the Indian Coast Guard fleet

  • Home
  • June 2025
  • अदम्य’ ही पहिली जलदगती गस्त नौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल ‘Adamya’, the first fast patrol boat, inducted into the Indian Coast Guard fleet
'Adamya', the first fast patrol boat, inducted into the Indian Coast Guard fleet

● गोव्यामध्ये 26 जून 2025 रोजी ‘अदम्य’ ही जलदगती गस्त नौका (Fast Patrol Vessel -FPV ) भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल झाली.
● या जलदगती गस्त नौकेची निर्मिती गोवा शिपयार्ड लिमिटेडने (GSL) केली आहे. अशा प्रकारच्या एकूण आठ जलदगती गस्त नौका निर्मिती प्रकल्पाअंतर्गतची ही पहिली गस्त नौका आहे.
● हे जहाज कंट्रोलेबल पिच प्रोपेलर्स (CPPs) आणि स्वदेशी बनावटीच्या गियरबॉक्सेसने सज्ज आहे. यामुळे हे जहाज समुद्रात उत्कृष्टपणे हालचाली करू शकतील, अधिक लवचितेने आपले कार्यान्वयन पार पाडू शकते, तसेच यामुळे एकूणात जहाजाच्या कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे.
● हे जहाज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, याअंतर्गत जहाजात 30 मि.मी. CRN-91 बंदूक, 12.7 मि.मी. च्या दोन रिमोट आधारे गोळीबार नियंत्रण करता येणाऱ्या स्थिर बंदुका, एक एकात्मिक ब्रिज प्रणाली ( IBS – संपर्क, नौवहन आणि नियंत्रण यंत्रणांमध्ये समन्वय साधणारी) एक एकात्मिक व्यासपीठ व्यवस्थापन प्रणाली (IPMS – जहाजाचे इंजिन, वीजपुरवठा, अग्निशमन, हवामान नियंत्रण, इंधन व्यवस्थापन, जलनिस्सारण, ध्वनीशमन अशा सर्व प्रमुख यंत्रणांमध्ये समन्वय साधणारी) आणि एक स्वयंचलित उर्जा व्यवस्थापन प्रणाली (APMS) अशा अत्याधुनिक सोयी सुविधांचा अंतर्भाव आहे.
● अशा प्रकारच्या अत्याधुनिक प्रगत प्रणालीमुळे भारतीय तटरक्षक दलाला देशाच्या विशाल सागरी क्षेत्रात अधिक अचूकतेने, कार्यक्षमतेने आणि प्रतिसाद क्षमतेने आपली कर्तव्ये पार पाडता येणार आहेत.
● ‘अदम्य’ या गस्ती नौकेची संपूर्ण निर्मिती तसेच संरचनात्मक आरेखन पूर्णपणे गोवा शिपयार्ड लिमिटेडने केले आहे.
● या गस्त नौकेतून जहाज बांधणी क्षेत्रातल्या भारताच्या वाढत्या क्षमतेचे दर्शन होते. एका अर्थाने हा प्रकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल ठरले आहे.
● या जलदगती गस्ती नौकेमुळे भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्याची ताकद अधिक वाढणार असून, यामुळे सागरी कायद्याची अंमलबजावणी, किनारी भागांमध्ये पाळत ठेवणे, शोध आणि बचाव कार्ये राबवणे तसेच भारताच्या आर्थिक स्वामित्व(सागरी) क्षेत्राचे (EEZ) संरक्षण या सगळ्याच्या अनुषंगाने तातडीने प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *