संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 04 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथे डिफकनेक्ट 2024 दरम्यान, महत्वाच्या आणि सामरिक संरक्षण तंत्रज्ञानातील नवोन्मेषांना प्रोत्साहन देण्यासाठी आयडीईएक्स (अदिती) सह अभिनव तंत्रज्ञानकुशल विकास योजनेचे उदघाटन केले.
अधिक माहिती
• या योजनेअंतर्गत, स्टार्ट-अप हे संरक्षण तंत्रज्ञानातील संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नांसाठी 25 कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान प्राप्त करण्यास पात्र आहेत.
• “ही योजना तरुणांच्या नवोन्मेषांना चालना देऊन देशाला तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेण्यास मदतगार ठरेल.”
• वर्ष 2023-24 ते 2025-26 या कालावधीसाठी 750 कोटी रुपयांची अदिती योजना ही संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या (डीडीपी) आयडीईएक्स (संरक्षण उत्कृष्टतेसाठी नवोन्मेष) आराखड्यांतर्गत तयार केली आहे.
• प्रस्तावित कालमर्यादेत सुमारे 30 डीप-टेक महत्वपूर्ण आणि सामरिक तंत्रज्ञान विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.
• आधुनिक सशस्त्र दलांच्या अपेक्षा आणि आवश्यकता आणि संरक्षण नवोन्मेषी परिसंस्थेच्या क्षमता यांच्यातील दरी मिटवण्यासाठी ‘टेक्नॉलॉजी वॉच टूल’ अर्थात तंत्रज्ञान देखरेख साधन तयार करण्याचीही संकल्पना आहे.