Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘अभय’ या जहाजाचे जलावतरण

‘अभय’ या जहाजाचे जलावतरण

अभयया  जहाजाचे जलावतरण

  • भारतीयनौदलासाठी मेसर्स जीआरएसई कडून  बांधण्यात येणाऱ्या पाणबुडीविरोधी वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील सातव्या ‘अभय’ जहाजाचे 25 ऑक्टोबर 2024 रोजी मेसर्स एल अँड टी, कट्टुपल्ली येथे जलावतरण करण्यात आले.
  • आठएएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी जहाजे बांधण्याच्या करारावर संरक्षण मंत्रालय आणि कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स (जीआरएसई) यांच्यात एप्रिल 19 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली.
  • अर्नाळाश्रेणीची जहाजे भारतीय नौदलाच्या सेवेत असलेल्या अभय श्रेणीच्या एएसडब्ल्यू कॉर्वेट्सची जागा घेतील आणि ती किनारपट्टी लगतच्या भागात पाणबुडीविरोधी अभियान, कमी तीव्रतेच्या सागरी मोहीम (एलआयएमओ) आणि माईन लेईन्ग कार्य करण्यासाठी याची संरचना करण्यात आली आहे.
  • एएसडब्ल्यूएसडब्ल्यूसी जहाजे सुमारे 77 मीटर लांब आहेत, आणि ती 1800 टन भारासह 25 नॉटिकल माईल चा कमाल वेग मिळवू शकतात.

अत्याधुनिक सामग्री संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी भारत आणि जर्मनी यांच्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या

  • भारतजर्मनी यांच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानात सहकार्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल असा संयुक्त जाहीरनामा करण्यात आला आहे.
  • केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह आणि जर्मन संघीय मंत्री बेट्टिना स्टार्क-वॉट्झिंगर यांनी अत्याधुनिक सामग्री संशोधन आणि विकासाला चालना देत परस्पर लाभांश मिळवण्यासाठी सहकार्याच्या उद्देशाने या संदर्भात जाहीरनाम्याची देवाणघेवाण केली.
  • पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही देवाणघेवाण झाली.

भौतिकशास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले यांचे निधन

  • प्रख्यातभौतिकशास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले यांचे  वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले.
  • बेंगळुरूयेथील भारतीय विज्ञान संस्थेच्या (आयआयएससी) ‘सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स’ (सीएचईपी) येथे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे.
  • त्यांचा’पद्मश्री’ने सन्मान करण्यात आला होता.
  • त्यामूळच्या पुण्याच्या होत्या. गोडबोले या उत्तम संशोधक होत्या.
  • महिलांनीविज्ञानामध्ये काम करावे, यासाठी त्यांचा आग्रह असे.
  • त्या1995 मध्ये ‘सीएचईपी’ येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या.
  • पुणेया ठिकाणच्या असलेल्या डॉ. रोहिणी गोडबोले हुजूरपागात शाळेच्या विद्यार्थिनी होत्या.
  • आठवीतअसताना शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करताना त्यांना विज्ञानाची गोडी लागली.
  • अकरावी- एस.एस.सीच्या गुणवत्ता यादीत त्या झळकल्या होत्या.
  • सरपरशुराम भाऊ महाविद्यालयातून त्यांनी गणित, भौतिकशास्त्र आणि संख्याशास्त्रात पदवी संपादन केली. त्यानंतर आयआयटी बॉम्बे मध्ये पुढील शिक्षण घेतले.
  • अमेरिकेतीलस्टोनि ब्रुक्स विद्यापीठातून त्यांनी 1979 यावर्षी पीएचडी पूर्ण केली .
  • केंद्रीयमंत्रिमंडळाच्या 2007 ते 2013 या काळात या वैज्ञानिक समितीच्या सल्लागार होत्या.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *