नव्वदच्या दशकात जाहिराती आणि दूरदर्शनवरील मालिकांचा लोकप्रिय चेहरा असलेल्या अभिनेत्री व निर्मात्या कविता चौधरी यांचे अमृतसर येथे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सर्फ कंपनीच्या जाहिरातीत साकारलेली ललिताजी यांची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाली होती. गेली काही वर्ष कविता चौधरी कर्करोगाशी झुंज देत होत्या.
अधिक माहिती
● दूरदर्शन ही एकच वाहिनी असताना जाहिरात व नायिकाप्रधान मालिकेतून आपल्या सहज अभिनयाने कविता चौधरी यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
● 1989 मध्ये ‘उडान प्रसारित झालेल्या ‘ मालिकेमुळे त्या घरोघरी लोकप्रिय झाल्या.
● या मालिकेत त्यांनी आयपीएस अधिकारी कल्याणी सिंह यांची भूमिका साकारली होती. याशिवाय, युवर ऑनर व आयपीएस डायरीज या मालिकांमधून त्यांनी काम केले.