अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन
- भारताचे मित्र म्हणून ओळखले जाणारे, शांतताप्रिय आणि सन 2002 मध्ये नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी जॉर्जिया प्रांतातील प्लेन्स येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
- ते अमेरिकेचे 39 वे अध्यक्ष होते.
- कार्टर डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते.
- अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक काळ हयात असणारे ते माजी अध्यक्ष होते.
- सन 1977 ते 1981 या काळात ते अमेरिकेचे अध्यक्ष होते.
- भारतमित्र म्हणून ते ओळखले जात.
- भारतातील आणीबाणी उठल्यानंतर जनता सरकारच्या काळात भारताला त्यांनी भेट दिली होती त्यांच्या भारत प्रेमाचे प्रतीक म्हणून हरियाणातील एका गावाला कार्टरपुरी म्हणून ओळखले जाते.(गावाचे नाव: दौलतपूर नसिराबाद)
अल्पचरित्र:
- जन्म : 1 ऑक्टोबर 1924
- वडील जेम्स कार्टर शेतकरी, आई लिलियन परिचारिका
- 1943 मध्ये अमेरिकेच्या नौदल अकादमीमध्ये (युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमी) छात्रसैनिक
- अटलांटिक आणि प्रशांत महासागरांमधील जहाजांच्या ताफ्यावर काम
- प्रतिष्ठित आण्विक पाणबुडी उपक्रमासाठीही निवड
- 1962 – स्टेट सेनटवर निवड
- 1970 जॉर्जियाचे 76 वे गव्हर्नर
- 1974 – अध्यक्षपदासाठी प्रचाराला सुरुवात
- तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा वॉटरगेट प्रकरणी 1974 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा
- 1976 – गेराल्ड फोर्ड यांचा पराभव करून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी
- 1977 – अमेरिकेचे 39 वे अध्यक्ष म्हणून शपथविधी
- 1980- दुसऱ्यांदा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या रोनाल्ड रेगन यांच्याकडून पराभव
- पराभवानंतर शांतता, पर्यावरण आणि मानवाधिकारांसाठी अथक प्रयत्न
- 2002 शांततेसाठी नोबेल पुरस्काराने गौरव
‘सीआरपीएफ‘च्या महासंचालकपदी वितुलकुमार
- केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) महासंचालक अनीश दयाळ सिंह 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
- वरिष्ठ पोलिस अधिकारी वितुलकुमार त्यांच्या जागी पदभार स्वीकारणार आहेत.
- उत्तर प्रदेश केडरचे 1993 च्या तुकडीचे ते अधिकारी असून सध्या ‘सीआरपीएफ‘चे विशेष महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
- 3 ऑगस्ट 1968 रोजी पंजाबमधील भटिंडा येथे जन्मलेल्या कुमार यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.
- आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कुमार यांनी पोलीस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
- त्यांची 9 फेब्रुवारी 2009 रोजी उपमहानिरीक्षक (डीआयजी), 31 डिसेंबर 2012 रोजी महानिरीक्षक (आयजी) आणि 1 जानेवारी 2018 रोजी अतिरिक्त महासंचालक ( एडीजी) पदावर पदोन्नती झाली.
- राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस पदक यासह अनेक सन्मानांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.