- परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी दूत म्हणून नियुक्ती झाली आहे.
- बागची हे संयुक्त राष्ट्र आणि जिनिव्हातील अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये भारताचे कायम प्रतिनिधी असतील.
- ते सध्याचे अधिकारी इंद्रमनी पांडे यांची जागा घेतील.
- बागची 1995 च्या तुकडीचे भारतीय परराष्ट्र सेवेचा अधिकारी असून मार्च 2020 मध्ये प्रवक्ते पदी नियुक्ती झाली होती.


