अर्थसंकल्प : 2024-25 (भाग – 1)
- सलग 8 वा अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसुधारणांची ब्ल्यू प्रिंट सादर केली.
- विमा क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणूक मर्यादा 74 टक्क्यांवरून 100 टक्के करण्याचा आणि कर कायदे सोपे करण्याचा प्रस्तावही सीतारामन यांनी मांडला.
- नव्या करप्रणालीनुसार नोकरदारांचे वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न (कलम ’87 ए’ नुसार रिबेट धरून) करमुक्त असेल.
क्षेत्रनिहाय निधीची तरतूद
- पेन्शन – २,७६,६१८ कोटी रुपये
- संशोधन – ४,९१,७३२ कोटी रुपये
- अनुदान – ३,८३,४०७ कोटी रुपये
- कृषी – १,७१,४३७ कोटी रुपये
- वाणिज्य, उद्योग – ६५,५५३ कोटी रुपये
- पूर्वोत्तर राज्यांचा विकास – ५,९१५ कोटी रुपये
- शिक्षण – १,२८,६५० कोटी रुपये
- ऊर्जा – ८१,१७४ कोटी रुपये
- परराष्ट्र व्यवहार – २०,५१७ कोटी रुपये
- वित्त – ६२,९२४ कोटी रुपये
- आरोग्य – ९८,३११ कोटी रुपये
- गृह – २,३३,२११ कोटी रुपये
- व्याज – १२,७६,३३८ कोटी रुपये
- माहिती तंत्रज्ञान – ९५,२९८ कोटी रुपये
- ग्रामीण विकास – २,६६,८१७ कोटी रुपये
- विज्ञान – ५५,६७९ कोटी रुपये
- सामाजिक न्याय – ६०,०५२ कोटी रुपये
- कर प्रशासन – १,८६,६३१ कोटी रुपये
- वाहतूक – ५,४८,६४९ कोटी
- शहरी विकास – ९६,७७७ कोटी रुपये
- अन्य – ४,८२,६५३ कोटी रुपये
- संरक्षण – ६,८१,२१० कोटी रुपये
- निव्वळ अतिरिक्त संसाधने – २३,००० कोटी रुपये
आर्थिक वर्ष 2025-26
उत्पन्न रु. कर
० ते ४ लाख. 0
४ ते ८ लाख. 5%
८ ते १२ लाख. 10%
12 ते 16 लाख 15%
16 ते 20 लाख 20%
20 ते 24 लाख 25%
24 लाखांपेक्षा जास्त 30%
राष्ट्रीय उत्पादन मिशनची स्थापना:
- ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला बळ देण्यासाठी ‘राष्ट्रीय उत्पादन मिशन’ स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना याद्वारे प्रोत्साहन दिले जाणार आहे.
- व्यवसाय सुलभता आणि खर्च; मागणी असलेल्या नोकऱ्यांसाठी भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ; चैतन्यशील एमएसएमई क्षेत्र;
- तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने या पाच मुख्य क्षेत्रांवर या मिशनचा उद्देश केंद्रित असेल.
- या योजनेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा समावेश असेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.
- राष्ट्रीय उत्पादन मिशन’ हे केंद्र सरकारची मंत्रालये आणि राज्ये यांच्यासाठी धोरण, प्रशासन आणि निरीक्षण यांसाठीची चौकट निश्चित करील.