Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘अर्नाळा’ नौदलाच्या ताफ्यात दाखल ‘Arnala’ inducted into the Navy fleet

'Arnala' inducted into the Navy fleet

● भारतीय नौदलासाठी बनवलेली पहिली उथळ पाण्‍यामध्‍ये उपयोगी पडणारी पाणबुडीविरोधी युध्‍दनौका -‘अर्नाळा’ नौदलाकडे सुपूर्द करण्‍यात आली.
● हे जहाज पाण्याखालील देखरेख, शोध आणि बचाव कार्य, तसेच कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमांसाठी (एलआयएमओ) डिझाइन केलेले आहे.
● या जहाजामध्ये किनारी पाण्यात पाणबुडीविरोधी क्रियाकलाप पार पाडण्याची क्षमता असून, प्रगत ‘माईन लेइंग’ क्षमतांनी सुसज्ज आहे.
● ही नौका गार्डन रीच शिपबिल्डर्स अ‍ॅन्ड इंजिनिअर्स (जीआरएसई), कोलकाता यांनी स्वदेशी पद्धतीने डिझाइन आणि निर्माण केले आहे.
● मेसर्स एल अँड टी शिपयार्ड, कट्टुपल्ली येथे ही युध्‍दनौका भारतीय नौदलाकडे ते सुपूर्द करण्यात आली.
● या नौकेला ‘अर्नाळा’ हे नाव, वसईजवळील ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्याच्या नावावरून देण्‍यात आले आहे.
● हा किल्ला भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे प्रतीक आहे.
● 77 मीटर लांब आणि 10.5 मी. रुंद असलेली ही युद्धनौका डीझेल इंजिन-वॉटरजेट संयोजनावर चालणारी सर्वात मोठी भारतीय नौका आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *