Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अल्कराझ फ्रेंच ओपन स्पर्धेचा नवविजेता

  • Home
  • Current Affairs
  • अल्कराझ फ्रेंच ओपन स्पर्धेचा नवविजेता
  • टेनिसचे भविष्य म्हणून पाहिले जात असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्कराझने आपला लौकिक पुन्हा एकदा सिद्ध करताना कारकीर्दीत प्रथमच फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  • अल्कराझने जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेवचा साडेचार तासाच्या मॅरेथॉन लढतीत 6-3, 2-6, 5-7, 6-1, 6-2 असा पराभव केला.
  • फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा अल्कराझ हा स्पेनचा सातवा खेळाडू ठरला.
  • यापूर्वी राफेल नदाल (14 वेळा), सर्गी ब्रुगएरा (2), ज्युआन कार्लोस फेरेरो (1), अल्बर्ट कोस्टा (1), कार्लोस मोया (1), आंद्रेस गिमेनो (1) या स्पेनच्या खेळाडूंनी ही स्पर्धा जिंकली आहे.
  • ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिल्या तीन अंतिम सामन्यांत विजेतेपद मिळवणारा अल्कराझ हा रॉजर फेडरर, स्टॅन वावरिंका, गुस्वात क्युएर्टन, स्टिफन एडबर्ग, बियॉर्न बोर्ग आणि जिमी कॉनर्स यांच्यानंतरचा पहिला टेनिसपटू.
  • फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे सर्वाधिक वेळा विजेतेपद राफेल नदाल ने पटकावले आहे. (14 वेळा)

फ्रेंच ओपन:-

  • फ्रेंच ओपन ज्याला रोलँड-गॅरोस  म्हणूनही ओळखले जाते .
  • ही एक प्रमुख टेनिस स्पर्धा आहे जी फ्रान्सच्या पॅरिसमधील स्टेड रोलँड गॅरोस येथे दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीत सुरू झाली आहे.
  • टूर्नामेंट आणि ठिकाणाची नावे फ्रेंच वैमानिक रोलँड गॅरोस याच्या नावावर आहे .
  • फ्रेंच ओपन ही जगातील प्रमुख क्ले कोर्ट चॅम्पियनशिप आहे आणि सध्या या पृष्ठभागावर होणारी एकमेव ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे.
  • कालक्रमानुसार ही चार वार्षिक ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी दुसरी आहे.ऑस्ट्रेलियन ओपननंतर आणि विम्बल्डन आणि यूएस ओपनच्या आधी .
  • सुरवात :- 1891
  • 2024 ही एकूण 123 वी स्पर्धा होती.
  • ही स्पर्धा क्ले कोर्ट वर खेळवली जाते

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *