Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध

अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध

अवनी लेखराचा पुन्हा सुवर्णवेध

  • अवनी लेखराने पॅरिसच्या पॅरालिंपिक  स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले.
  • दहा मीटर एअर रायफल च्या एसएचवन गटात 6 गुणांच्या विक्रमासह सोनेरी यश संपादन केले.
  • पॅरालिंपिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक राखणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.
  • तीन वर्षांपूर्वी अवनीने टोकियो पॅरारलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.
  • या स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकारात अवनी लेखराबरोबरच मोना अग्रवालने कांस्यपदक तर मनीष नरवालने रोप्य पदक जिंकले.
  • महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत प्रीती पालने कांस्यपदक पटकावले. पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत अथलेटिक्स क्रीडा प्रकारातील हे भारताचे पहिले पदक ठरले.

माजी जलतरणपटू अविनाश सारंग यांचे निधन

  • भारताचे माजी अव्वल जलतरणपटू अविनाश सारंग यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले.
  • बँकॉक आशियाई  क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक विजेत्या भारतीय वॉटरपोलो संघाचे ते सदस्य होते.
  • फ्रीस्टाइल आणि बटरफ्लाय प्रकारातही ते उत्तम जलतरणपटू होते.
  • शासनाने त्यांचा शिवछत्रपती आणि महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला होता.
  • सारंग यांना अर्जुन क्रीडा पुरस्कारही मिळाला होता.
  • सारंग यांनी 28 ऑगस्ट 1974 मध्ये पहिलाच प्रयत्न इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा मानही मिळवला होता.
  • निवृत्तीनंतर त्यांनी वॉटरपोलो पंच म्हणूनही काम पाहिले .

एनएडीपी‘- हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंगमध्ये करार

  • नागपूर येथील राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी आणि हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंग यांनी परस्परांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्यामुळे या अकादमीतील व्याख्यात्यांना हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंगचे ‘केस स्टडी’ उपलब्ध होऊ शकणार असून शिकवण्याचे कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे भारतातील संरक्षण उत्पादन वाढणे अपेक्षित आहे.
  • राष्ट्रीय संरक्षण अकादमी 1978 ला स्थापन करण्यात आली.
  • ती पूर्वी आयुध निर्माण स्टॉफ कॉलेज म्हणून ओळखली जायची.
  • या अकादमीमध्ये संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.
  • याद्वारे आयुध निर्माणी सेवा अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन भारतातील संरक्षण उत्पादनांचा दर्जा वाढवून त्यात वाढ करण्याचे प्रयत्न केले जातात.
  • हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंग ही ना-नफा, ना-तोटा या तत्त्वावर चालणारी संस्था आहे.
  • ही संस्था हार्वर्ड बिझनेस स्कूलशी संलग्नित आहे.
  • भविष्यात अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांना हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंगचे परवाने उपलब्ध होऊ शकतील.

अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते  सातव्या राष्ट्रीय पोषण माह 2024 चा शुभारंभ

  • गुजरातमध्ये गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथून  सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा शुभारंभ करण्यात आला.
  • देशभरात पोषण विषयक जागरुकता आणि लोककल्याण यांना चालना देण्यावर केंद्रीत असलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, गुजरात सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्री भानुबेन बाबरिया, तसेच भारत सरकार आणि गुजरात राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
  • “एक पेड माँ के नाम” अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेने या दिवसाची सुरुवात झाली.
  • केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी, गुजरातच्या महिला आणि बाल विकास मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या मोहिमेचे नेतृत्व केले आणि गांधीनगर येथील अंगणवाडी केंद्रात पोषण आणि पर्यावरणीय शाश्वततेचे महत्त्व दर्शवणाऱ्या फळझाडांच्या रोपांची लागवड केली.
  • सातव्या राष्ट्रीय पोषण माह 2024 मध्ये रक्तक्षय (ॲनिमिया), ग्रोथ मॉनिटरिंग, पूरक आहार, पोषण भी पढाई भी, उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञान आणि एक पेड माँ के नाम या संकल्पनांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
  • 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण माह चे आयोजन करण्यात आले.
  • राष्ट्रीय पोषण कार्यक्रमाला 2018 मध्ये सुरवात करण्यात आली होती
  • राष्ट्रीय पोषण कार्यक्रम सरकारने देशातील नागरिकांना कुपोषण मुक्त करण्यासाठी सुरू केला आहे.
  • देशातील अनेक राज्यांमध्ये दारिद्र्यामुळे लोकांना पुरेसे व पोषक भोजन मिळत नाही. अशा कुटूंबामध्ये एखाद्या गर्भवती महिलेबरोबरच नवजात शिशुंवरही याचा प्रतिकूल परिणाम होतो.
  • एका अहवालानुसार आज देशातील जवळपास प्रत्येक तिसरे मूल कुपोषित आहे. देशातील ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने राष्ट्रीय पोषण अभियान (National Nutrition Programme) सुरू केले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *