● भारताचा तारांकित स्टीपलचेसपटू अविनाश साबळेने आपला वेगळा दर्जा पुन्हा सिद्ध केला.
● बीडच्या अविनाशने आशियाई अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
● पाठोपाठ ज्योती याराजीने 100 मीटर अडथळा शर्यतीत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.
● साबळेने आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत स्टीपलचेस प्रकारातील पुरुष विभागात भारताची 36 वर्षांपासूनची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपवली.
● साबळेने 8 मिनिटे 20.92 सेकंदांत शर्यत पूर्ण केली.
● साबळेचे हे आशियाई स्पर्धेतील दुसरे पदक ठरले.
● याआधी 2019 मध्ये त्याने रौप्य पदक मिळवले होते.
● स्टीपलचेस शर्यतीत स्पर्धेच्या इतिहासातील भारताचे हे केवळ तिसरे सुवर्णपदक असून यापूर्वी 1975 च्या स्पर्धेत हरबेल सिंग तर 1989 मध्ये दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत दिना रामने सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हापासून एकाही भारतीय अॅथलिट्ला सुवर्णपदक जिंकता आले नव्हते. अविनाशने हा दुष्काळ संपुष्टात आणला.



