मराठी रंगभूमीवरून अभिनयाची सुरुवात करत मराठी- हिंदी चित्रपट, मालिका निर्मिती अशा विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण केलेले प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना 2023 या वर्षाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ क्त शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीने पुरस्कारासाठी अशोक सराफ यांची निवड केली.
अधिक माहिती
● समितीतील इतर सदस्य: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समितीचे उपाध्यक्ष, तर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार सदस्य व वर्षी डॉ. अनिल काकोडकर, डॉ. शशिकला वंजारी, वासुदेव कामत, विकास खारगे, डॉ. गो. ब. देगलूरकर आणि अॅड. उज्वल निकम तसेच डॉ. जयंत बाचे नारळीकर अशासकीय सदस्य होते.
● ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्य सरकारकडून देण्यात येणारा हा सर्वांत मोठा पुरस्कार आहे.
● आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.
● हा पुरस्कार देण्यास सन 1995 पासून सुरुवात झाली.
● अशोक सराफ यांनी आतापर्यंत 300 हुन अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
● अशोक सराफ यांनी 1960च्या उत्तरार्धात मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
● व्यावसायिक नाटकापासून कारकिर्दीला सुरुवात करत त्यांनी ‘पांडू हवालदार’, ‘राम राम गंगाराम’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘आत्मविश्वास’, ‘गंमत जंमत’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘एक उनाड दिवस’, ‘एक डाव धोबीपछाड’, ‘शुभमंगल सावधान’, ‘आई नंबर वन’ अशा अनेक मराठी चित्रपटांतून – विविध रंगी भूमिका करुन प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
● त्यांनी गंभीर आणि खलनायकी भूमिकाही ताकदीने उभारल्या.
● ‘करण-अर्जुन’, ‘येस बॉस’, ‘बेनाम बादशाह’, ‘जोरू का गुलाम’, ‘खूबसूरत’, ‘कोयला’ आणि ‘सिंघम’ यासारख्या हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार
● महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो .
● 1995 मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युती सरकारच्या काळात पुरस्काराला सुरुवात.
● पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1996 मध्ये पु .ल .देशपांडे यांना दिला गेला.
● साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा, पत्रकारिता, लोकप्रशासन, स्वास्थ्य कार्य या क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार प्रदान केला जातो.
● पुरस्काराचे स्वरूप 25 लाख रुपये, स्मृतीचिन्ह , प्रमाणपत्र
● महाराष्ट्र सरकारद्वारे नेमलेल्या कमिटीद्वारे या पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाते.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती
• 1996 – पु. ल .देशपांडे (साहित्य)
• 1997 – लता मंगेशकर (कला, संगीत)
• 2020 – आशा भोसले (कला, संगीत)
• 2022 – अप्पासाहेब धर्माधिकारी (कला, संगीत)