● फिलिपिन्समध्ये झालेल्या 36 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली.
● भारतीय संघाने दोन सुवर्ण आणि दोन रौप्य अशी एकूण चार पदके पटकावली असून, या संघात मुंबईतील वेदांत साक्रे याने सुवर्णपदक पटकावले.
● 20 ते 27 जुलै दरम्यान, फिलिपिन्समधील क्युझॉन येथे आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड झाली.
● यंदाच्या स्पर्धेत 77 देशांतील 298 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
● स्पर्धेत एकूण 30 सुवर्ण, 60 रौप्य, 89 कांस्यपदके वितरित करण्यात आली.
● त्यात राजकोटच्या रुद्र पेतानी, मुंबईच्या वेदांत साक्रे यांनी सुवर्णपदक तर हरियाणाच्या भव्या गुंवाल, कोलकाता येथील सुभ्रोजित पॉल यांनी रौप्यपदक मिळवले.
● स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या दहा स्पर्धकांमध्ये रुद्र पेतानी याने स्थान मिळवले.
● या संघाला प्रा. पुरुषोत्तम काळे, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे विक्रांत घाणेकर, डॉ. मयूरी रेगे, ऑट्रया विद्यापीठाचे, सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे सचिन राजगोपालन यांनी मार्गदर्शन केले.
● या स्पर्धेच्या पदकतालिकेत भारताने पाचवे स्थान मिळवले.
● चीन आणि सिंगापूरने प्रत्येकी चार सुवर्ण पदके, तर अमेरिका, इराण यांनी प्रत्येकी तीन, तुर्की आणि रशिया यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके मिळवली.
● पेशी आणि आण्विक जीवशास्त्र, जैववैद्यकीयशास्त्र, परिसंस्था व वर्गीकरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांचा स्पर्धेत समावेश होता.