आंतरराष्ट्रीय सागरी संघटना परिषदेच्या सभेमध्ये झालेल्या निवडणुकीत 2024-25 या दोन वर्षांसाठी भारताची या संघटनेवर सर्वाधिक मतांनी फेरनिवड झाली आहे.
• या फेरनिवडीमुळे ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन आणि संयुक्त अरब अमिरात(यूएई) या देशांसोबत “आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारामध्ये सर्वाधिक रुची ” असलेल्या दहा देशांच्या श्रेणीत भारताचा समावेश झाला आहे.
• जागतिक सागरी क्षेत्रामध्ये भारताची सेवा पुढे सुरू राहावी म्हणून आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाकडून भारताला मोठ्या प्रमाणावर पाठबळ उपलब्ध झाले.
• आंतरराष्ट्रीय सागरी संघटना सागरी उद्योगाचे नियमन, जागतिक व्यापार, परिवहन आणि सर्व सागरी व्यवहारांना पाठबळ देणारी आघाडीची संघटना आहे.


