जर्मनीचे माजी फुटबॉलपटू आंद्रेस ब्रहम यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. 1990 मध्ये तत्कालीन पश्चिम जर्मनीने फुटबॉल वर्ल्ड कप उंचावला. अंतिम सामन्यात पश्चिम जर्मनीने अर्जेंटिनावर 1-0ने मात केली होती. हा एकमेव गोल ब्रेहम यांनी 85 व्या मिनिटाला पेनल्टीवर केला होता. त्यामुळे जर्मनीसाठी ते ‘हिरो’ झाले होते.


