स्वदेशी बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीतून एकाच वेळी चार लक्ष्यांना टिपण्यात यश आल्याची माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने दिली आहे. अशा प्रकारची क्षमता विकसित करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. हवाई दलाकडून 12 डिसेंबर 2023 रोजी ही चाचणी घेण्यात आली होती. भारतीय हवाई दलाने 12 डिसेंबर 2023 रोजी सूर्यलंका एअर फोर्स स्टेशनवर अस्त्रशक्ती 2023 दरम्यान हे प्रात्यक्षिक आयोजित केले होते.
आकाश
• आकाश ही भारत डायनॅमिक्स लिमिटेडकडून (BDL) लहान श्रेणीची सरफेस टू एअर (एसएएम) हवाई संरक्षण प्रणाली आहे.
• जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी ‘आकाश’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
• यामध्ये 25 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्षाचा भेद करता येतो.
• आकाश वेपन सिस्टीम ही एक स्वदेशी संरक्षण प्रणाली आहे.
• ही यंत्रणा शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून मोठ्या क्षेत्राचे संरक्षण करू शकते.
• BDL वेबसाइटनुसार, आकाश वेपन सिस्टीम (AWS) ग्रुप मोड किंवा ऑटोनॉमस मोडमध्ये एकाच वेळी अनेक लक्ष्यांना भेदू शकते.
• यात बिल्ट इन इलेक्ट्रॉनिक काउंटर-काउंटर मेजर्स (ECCM) वैशिष्ट्ये आहेत.
• संपूर्ण शस्त्र यंत्रणा मोबाईल प्लॅटफॉर्मवर तैनात आहे.
• आकाश क्षेपणास्त्र प्रणाली हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने व यूएव्ही 4-25 किमी अंतरावर उड्डाण करू शकते.
• हे लक्ष्य शोधण्यापासून ते मारण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अतिशय वेगाने पूर्ण करते. याशिवाय, त्याची संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित आहे.
• हे अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह जॅमिंग प्रभावीपणे रोखू शकते.
• ही यंत्रणा रेल्वे किंवा रस्त्याने वेगाने वाहून नेले जाऊ शकते आणि त्वरीत तैनात केले जाऊ शकते.