Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

आकाशगंगेजवळ तारानिर्मितीचा स्फोटक कारखाना

  • Home
  • Current Affairs
  • आकाशगंगेजवळ तारानिर्मितीचा स्फोटक कारखाना
  • संपूर्ण ब्रह्मांडात तारानिर्मिती ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
  • भारतीय शास्त्रज्ञांनी नुकतेच आपल्या आकाशगंगेपासून तीन कोटी प्रकाशवर्षे अंतरावर असलेली तारानिर्मितीची एक ज्वलंत प्रणाली शोधली आहे.
  • पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राचे शास्त्रज्ञ (आयुका) प्रा. वैदेही पालिया आणि प्रा. ध्रुव सायकिया यांनी या संबंधीचे संशोधन केले आहे.
  • ‘कॅथरिन व्हील’ नामक एक गामा-किरण उत्सर्जित करणाऱ्या वलयाकार (रिंग) दीर्घिकमध्ये ही तारानिर्मितीची स्फोटके सापडली आहेत.
  • ‘अॅस्ट्रॉफिजिकल जर्नल लेटर्स’ या वैज्ञानिक नियतकालिकात यासंबंधीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

नक्की संशोधन काय ?

  • एखादी दीर्घिका जेव्हा दुसऱ्या दीर्घिकेशी टक्कर घेते किंवा छेदते, तेव्हा ‘कॅथरिन व्हील’ सारख्या गूढ रचना तयार होतात.
  • दीर्घिकांच्या छेदण्यातून मोठ्या प्रमाणावर शॉक वेव्ह निर्माण होतात. यामुळे आंतरतारकीय वायू बाहेर फेकला जातो. पर्यायाने त्या दीर्घिकेत आंतरतारकीय वायूचा अभाव निर्माण होता.
  • त्याचबरोबर काही भागांत जास्त प्रमाणात नवीन तारे निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. शास्त्रज्ञांनी ‘कॅथरिन व्हील’ प्रणालीचे रेडिओ, ऑप्टिकल आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांद्वारे निरीक्षण केले आहे. त्यात तारा-निर्मितीची जबरदस्त प्रक्रिया टिपण्यात आली आहे.
  • ही प्रक्रिया दोन दीर्घिकांच्या टक्करमुळे तयार झाल्याची पुष्टी शास्त्रज्ञांनी केली आहे.

संशोधनाची पार्श्वभूमी

  • ब्रह्मांडातील रहस्य उलगडणारा संकेत वाहक म्हणजे प्रकाश (फोटॉन) होय.
  • सर्वांत ऊर्जावान फोटॉन म्हणजे गॅमा किरण फोटॉन होय. त्याची तरंगलांबी ही अणुकेंद्रकाच्या व्यासापेक्षा लहान असते.
  • पृथ्वीवर असे गॅमा किरण आपल्याला आकाशात वीज चमकल्यावर किंवा किरर्णोत्सर्ग झाल्यावर दिसतात.
  • ही गॅमा किरणे ब्रह्मांडात अत्यंत तीव्र आणि स्फोटक खगोलभौतिकी वातावरणात तयार होतात.
  • न्यूट्रॉन तारे, पल्सर किंवा सुपरनोव्हा स्फोट अथवा कृष्णविवरांच्या आसपास गॅमा किरणांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते.
  • शास्त्रज्ञांनी याच गॅमा किरणांद्वारे तारानिर्मितीचा कारखाना शोधला आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *