आचार्य अत्रे यांचे 125 व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जन्म घ्यावी सासवड येथे यावर्षीचे (2023) आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे.
13 आणि 14 ऑगस्टला होणाऱ्या या 25 व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार साहित्यक आणि जडण-घडण मासिकाचे मुख्य संपादक डॉक्टर सागर देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.
या संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते होणार आहे.
आजवर या संमेलनाचे अध्यक्षपद बाबासाहेब पुरंदरे, व. पु. काळे, डॉक्टर सदानंद मोरे, उत्तम कांबळे, सुभाष भेंडे , ना. धों. मनोहर, डॉक्टर विठ्ठल वाघ ,डॉक्टर रावसाहेब कसबे, रामदास फुटाणे इत्यादींनी भूषविले होते.
रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले डॉक्टर देशपांडे यांची 13 पुस्तके प्रकाशित झाले असून आजवर त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे .
शिक्षणतज्ञ डॉक्टर जे. पी. नाईक ,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्यावरील त्यांचे चरित्रग्रंथ गाजले आहेत.



