Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण 50 years of the Emergency

  • Home
  • June 2025
  • आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण 50 years of the Emergency
50 years of the Emergency

● तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लादली.
● त्यानंतरचे 21 महिने देशात आणीबाणी राहिली आणीबाणी लादण्याच्या घटनेला आज (25 जून 2025) पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. आणीबाणीच्या काळातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी पुढीलप्रमाणे:
● जानेवारी 1966 : इंदिरा गांधी पंतप्रधानपदावर विराजमान.
● नोव्हेंबर 1969 : पक्षशिस्त भंग केल्यानंतर गांधी यांची हकालपट्टी झाल्यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली.
● 1971 : विरोधी पक्षनेते राज नारायण यांनी रायबरेली येथून इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक हरल्यानंतर त्यांच्यावर निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप करून तक्रार दाखल केली.
● 1973-75 : इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आंदोलने झपाट्याने वाढली.
● 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धानंतर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर महागाईत वाढ झाली, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. डळमळीत अर्थव्यवस्थेमुळे गुजरातपासून बिहारपर्यंत देशभर जनआंदोलने सुरू झाली.
● 12 जून 1975: अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांना निवडणूक प्रचारातील गैरप्रकारांप्रकरणी दोषी ठरवले आणि त्यांची निवडणूक रद्द ठरवली.
● 22 जून 1975: जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी दिल्लीत रामलीला मैदानात मोठ्या सभेचे आयोजन केले.
● 24 जून 1975 : इंदिरा गांधी यांना संसदीय विशेषाधिकार राहिलेले नाहीत. त्यांना मतदान करण्यास मनाई करण्यात आली आहे, पण त्या पंतप्रधान म्हणून कायम राहू शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला
● 25 जून 1975 : राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी इंदिरा गांधी यांच्या सल्ल्याने आणीबाणी जाहीर केली. विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली, त्याचवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीज सेवा खंडित करण्यात आली.
● २६ जून १९७५ : इंदिरा गांधी यांनी आकाशवाणीवरून राष्ट्राला संबोधित करत आणीबाणी लावण्यामागची कारणे स्पष्ट केली.
● ३० जून १९७५ : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना थेट अटक करण्यास सुरुवात झाली.
● १ जुलै १९७५ : आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी २० कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.
● ५ जुलै १९७५ : जमात-ए-इस्लामी, आनंद मार्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी २६ संघटनांवर बंदी घालण्यात आली.
● २३ जुलै १९७५ : आणीबाणीला राज्यसभेची मंजुरी.
● २४ जुलै १९७५ : लोकसभेतही आणीबाणीच्या बाजूने मतदान.
● २१ मे १९७६ : न्यायालयाचा हस्तक्षेप थांबविण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली.
● २५ ऑगस्ट १९७६ : विवाहाचे वय वाढविण्याची तरतूद असलेले विधेयक मांडण्यात आले.
● ३ नोव्हेंबर १९७६ : घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेची मंजुरी.
● १ सप्टेंबर १९७६ : संजय गांधी यांनी दिल्लीत जबरदस्तीने मोठ्या प्रमाणावर नसबंदी मोहीम सुरू केली. हजारो पुरुषांना त्यांची इच्छा नसतानाही नसबंदी करावी लागली.
● १८ जानेवारी १९७७ : तुरुंगातून राजकीय नेत्यांना बाहेर काढण्यात आले आणि नव्याने निवडणुकीची घोषणा इंदिरा गांधी यांनी केली.
● २० जानेवारी १९७७ : पाच वर्षे आणि दहा महिने पूर्ण झाल्यानंतर लोकसभा बरखास्त करण्यात आली.
● ११ फेब्रुवारी १९७७ : राष्ट्रपती फकरुद्दीन अली यांचा कार्यालयात मृत्यू झाला.
● १६ मार्च १९७७ : लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी पराभूत झाले.
● २१ मार्च १९७७ : आणीबाणी मागे घेतल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
● २४ मार्च १९७७ : मोरारजी देसाई यांनी जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *