शालेय विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी हा उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात येणार आहेत.
उपक्रमाचा उद्देश
• विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे
• विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे
• ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी
• विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे
• विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे
• नैराश्यावर मात करण्याची क्षमता निर्माण करणे
उपक्रमात समावेश असणारे घटक
• प्राणायाम, योग, ध्यानधारणा, श्वसनांची तंत्रे
• आपत्ती व्यवस्थापनातील मूलतत्त्वे आणि व्यावहारिक प्रशिक्षणे
• स्वतःच्या आरोग्याच्या रक्षणासाठी उपाययोजना
• समस्या निराकरणाची तंत्रे
• कृती, खेळ यावर आधारित उपक्रम
• नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य