Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

  • Home
  • Current Affairs
  • आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

निरुपणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारने प्रदान केला.

पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून वाढविण्यात आली असून त्यानुसार 25 लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असेल.

एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या आधी नानासाहेब धर्माधिकारी यांना 2008 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आप्पासाहेबांचे सामाजिक कार्य :

पद्मश्री डॉक्टर दत्तात्रय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म 14 मे 1946 रोजी झाला असून गेल्या 30 वर्षापासून ते निरूपण करत आहेत.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाज प्रबोधनाचे बाळकडू वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून मिळाले .

समाज प्रबोधनाला मानवी उत्थानाची जोड देण्याचे काम त्यांनी केले .त्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापन केले .

बाल संस्कार वर्ग, आरोग्य शिबिर ,रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती ,परिसर स्वच्छता, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, विहीर पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप यासारखे उपक्रम त्यांनी हाती घेतली.

आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छता दूत म्हणूनही ओळखले जातात.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार :

महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो .

1995 मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युती सरकारच्या काळात पुरस्काराला सुरुवात.

पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1996 मध्ये पु .ल .देशपांडे यांना दिला गेला .

साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा, पत्रकारिता, लोकप्रशासन, स्वास्थ्य कार्य या क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार प्रदान केला जातो.

पुरस्काराचे स्वरूप – 25 लाख रुपये, स्मृतीचिन्ह , प्रमाणपत्र

महाराष्ट्र सरकारद्वारे नेमलेल्या कमिटीद्वारे या पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाते.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती:-

1)1996-  पु. ल .देशपांडे (साहित्य)

2)1997 – लता मंगेशकर (कला, संगीत)

3) 1999 – विजय भाटकर (विज्ञान)

4) 2001 – सचिन तेंडुलकर (क्रीडा)

5) 2002 – भीमसेन जोशी (कला, संगीत)

6) 2003 –  अभय बंग आणि राणी बंग (चिकित्सा कार्य)

7) 2004 – बाबा आमटे (समाजसेवा)

8) 2005 – रघुनाथ माशेलकर (विज्ञान)

9) 2006 –  रतन टाटा (लोकप्रशासन)

10) 2007 – र. कृ. पाटील (समाजसेवा

11) 2008 – नानासाहेब धर्माधिकारी(समाजसेवा) ,मंगेश पाडगावकर (साहित्य)

12) 2009 –  सुलोचना दिली (कला ,सिनेमा)

13) 2010 –  जयंत नारळीकर (विज्ञान)

14) 2011 – अनिल काकोडकर (विज्ञान)

15) 2015 – बळवंत मोरेश्वर पुरंदरे (साहित्य)

16) 2020 – आशा भोसले (कला, संगीत)

17) 2022 – अप्पासाहेब धर्माधिकारी (कला, संगीत)

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *